Cyclone Tauktae : तोक्ते वादळामुळे सिंधुदुर्गात जवळपास 125 कोटींच्या नुकसानीची शक्यता, पंचनामे अद्याप सुरु
आजच्या दिवसापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ 120 कोटी तर नुकसान झालेली आहे तर उद्या संध्याकाळ पर्यंत 125 कोटी रुपयांच नुकसान वाढू शकते.
सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना दिलासा दिला आहे. पंचनामे दोन दिवसात पूर्ण होतील, नुकसानीचा आकडा हा शासनाकडे येईल आणि कोकणवासीय नाराज होणार नाही, अशा पद्धतीचा कोकणवासीयांना भरीव मदत दिली जाईल, असं कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
कालच्या दौऱ्यानंतर अनेक लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की ते कोकणात कोणाच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आले नव्हते तर कोकणवासियांना दिलासा द्यायला आले होते. भविष्यात कोकण किनारपट्टीला कायमस्वरूपी काय उपाय योजना करता येईल, यासाठीसुद्धा आराखडा करण्याचे निर्देश काल मुख्यमंत्र्यांनी दिले. आजच सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानीची आढावा बैठक घेतला. त्या आढावा बैठकीत सद्यस्थितीत जवळजवळ 85 ते 90 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. आजपर्यंत घरांचे नुकसान झालेले आपल्याला दिसतंय ते साडेसात हजार घरांच्या नुकसान भरपाईची योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आखावी लागेल, अशी आजची परिस्थिती आहे. परंतु 85 ते 90 टक्के पंचनामे झाले असतील असं आपण म्हटलं तर घरांच्या पंचनाम्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.
आपल्याकडे मनुष्यहानी 4 झालेली आहे. आजच मदत व पुनर्वसन मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसान आढावा बैठक घेत आहेत. ते स्वतः मृतांना नुकसान भरपाई देणार आहेत. शेतीचे नुकसान, जलसिंचन असेल या सर्व नुकसानीची आकडेवारी 20 कोटीपर्यंत जाईल, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समिती इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल याच सहा कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. पशुधनाचे नुकसान 1 कोटी 20 लाख रुपये पर्यंत झालंय.
महावितरणचे आतापर्यंतचे नुकसान 35 कोटींपर्यंत झाले आहे. मत्स्य व्यवसायाचे सुमारे अडीच कोटीचं नुकसान झालेलं आतापर्यंत पाहायला मिळत आहे. मच्छीमारांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंशतः 74 बोटीचं तर पूर्णतः 35 बोटीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अंशतः 71 बोटीचं तर पूर्ण 3 बोटीचं नुकसान झालं होतं. जिल्ह्यातील मच्छीमारांची जाळी 1173 अंशतः तर 7102 जाळीचं नुकसान झालेलं आहे.
आजच्या दिवसापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ 120 कोटी तर नुकसान झालेली आहे तर उद्या संध्याकाळ पर्यंत 125 कोटी रुपयांच नुकसान वाढू शकते. रत्नागिरी जिल्ह्यात घरांची आकडेवारी आहे त्यात चार ते साडेचार हजार घरांचे अंशतः घरांचे नुकसान झाले आहे. मात्र हा आकडा भविष्यात वाढू शकतो.
दोन्ही जिल्ह्यांची आकडेवारी आणि त्याचे पंचनामे उद्या संध्याकाळपर्यंत शासनाला पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली मदत लवकरात लवकर महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाहीर करतील. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आज पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. उद्या नाना पटोले सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. काल रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर होते. विरोधी पक्षनेते सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. जे नेते केंद्र सरकारच्या निगडित होते, त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत किनारपट्टीला मदत मिळवावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी तातडीने केंद्र सरकारच्या यंत्रणेला विनंती केली पाहिजे. पंतप्रधानाना विनंती केली पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एनडीआरएफ आणि एसडीआरएफ याचे निकष बाजूला ठेऊन या कोकण किनारपट्टीला दिलासा दिला गेल पाहिजे.
उदय सामंत यांनी कोकणवासियांना सांगितलं की, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौऱ्या झाला शासनाला सर्व पंचमामे पोहोचल्यानंतर जास्तीत जास्त मदत आंबा बागायदार, मच्छीमार, काजू बागायतदार , घरांची पडझड झालेली आहे यांना व्यवस्थितरित्या मदत दिली जाईल, अशा पद्धतीचं आश्वासन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे.