(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Soygaon Nagar Panchayat: अब्दुल सत्तारांचा दानवेंना झटका; निवडून आलेल्या भाजपच्या चार सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश
Soygaon Nagar Panchayat: सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या चिंनावर निवडणूक आलेले 6 सदस्यांपैकी 4 सदस्य फुटले असून त्यांनी सेनेच्या गटात जिल्हाधिकारी यांच्याकडे तशी नोंदनी केली आहे.
Soygaon Nagar Panchayat: महाराष्ट्राचे राज्यमहसूलमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का दिला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या चिंनावर निवडणूक आलेले 6 सदस्यांपैकी 4 सदस्य फुटले असून त्यांनी सेनेच्या गटात जिल्हाधिकारी यांच्याकडे तशी नोंदनी केली आहे. त्यामुळं शिवसेनेकडे असलेल्या सदस्य संख्या 17 पैकी 15 झाली. सोयगाव नगरपंचायत अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात येते.
रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. ते दोघे स्वतः किंवा घरचा सदस्य निवडणूक रिंगणात उभा असतात, तेव्हा एकमेकांना मदत करतात. पण इतर निवडणुकीत एकमेकांना नामोहरण करण्याची संधी सोडत नाहीत. याचा प्रत्यय दोघांच्याही मतदारसंघात असलेल्या सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत पाहायला मिळालं. दोघांनाही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि यामध्ये अब्दुल सत्तार यांची सरशी झाली. भाजपाच्या ताब्यात असलेली सोयगाव नगरपंचायतीवर भगवा फडकवला. 17 सदस्य असलेल्या नगरपंचायत येथील तब्बल 11 सदस्य शिवसेनेचे होते. तर, 6 ठिकाणी भाजपा विजयी झालं होतं. या सहापैकी देखील 4 सदस्यांनी भाजपाला रामराम करत शिवसेनेच्या गटात सहभागी झाले. तशी नोंदणी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे केलीय. वॉर्ड क्र.5 वर्षा घनगाव ,वॉर्ड क्र.11 संदीप सुरडकर, वॉर्ड क्र.13 ममताबाई इंगळे आणि वॉर्ड क्र.14- आशियाना शाह यांचा समावेश आहे. त्यामुळं भाजपकडं आता सोयगाव नगर पंचायत मध्ये आता केवळ 2 सदस्य शिल्लक राहिले आहेत.
भाजपच्या 4 सदस्यांनी सोडचिठ्ठी दिल्याचं माहिती मिळताच एबीपी माझानं भाजपाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यापर्यंत ही बातमी अद्याप पोहोचलेली नव्हती. त्यांना अशा प्रकारची काही घटना घडली आहे याचीदेखील माहिती नव्हती. त्यामुळे मी या सगळ्या प्रकरणांमध्ये माहिती घेऊन सांगतो, असं रावसाहेब दानवे एबीपी माझा शी बोलताना म्हणाले.
निवडणुकीच्या निकाला दिवशीच अब्दुल सत्तार निवडून आलेले सदस्य मी भाजपकडे ठेवणार नाही, असं म्हटलं होतं. काही दिवसातच त्या सहा सदस्यांपैकी चार सदस्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत सेनेच्या गटात सहभागी झाले आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या या राजकीय खेळीने रावसाहेब दानवे मात्र घायाळ झाले असतील आणि याचे पडसाद भविष्यातील राजकारणात वारंवार पाहायला मिळतील.
हे देखील वाचा-
- ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपालांचा सही करण्यास नकार, भुजबळांची माहिती
- Maharashtra School Colleges Start: आजपासून राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज अनलॉक; नियम पाळावेच लागणार
- दिल्ली-जेएनपीटी हायवेमुळे दिल्लीवरुन मुंबईत 12 तासांत पोहोचणार, केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha