एक्स्प्लोर

नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री घाणेरड्या राजकरणात व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सध्या आपल्या कामात व्यस्त आहेत. महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे,

नागपूर :  नागपुरात (Nagpur Crime News)  8 वर्षीय चिमुकल्या मुलीवर 20 रुपयाचे आमिष देऊन लहान बहिणीसमोर अत्याचार घडल्याची घडली आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा  साधला आहे. निर्लज्ज,  गद्दार मुख्यमंत्री  सध्या सेलेब्रिटींसोबत फोटो काढण्यात व्यस्त आहेत, तर  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे घाणेरडं राजकारण करण्यात व्यस्त आहे.  सध्या राज्यात  कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले,  महाराष्ट्रात असंवैधानिक, गद्दार मिंठे मुख्यमंत्री पदावर बसले आहेत.  सध्या ते  सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यात मग्न आहे. फोटोमध्ये ते इतके व्यस्त आहेत की, त्यांनी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे   गृहमंत्री हे घाणेरे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. 

काय आहे प्रकरण?

नागपुरात 8 वर्षीय चिमुकलीवर  अत्याचार केल्याची घटना पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत समोर आली आहे.  अनोळखी आरोपीचे पोलिसांकडून स्केच तयार करत तपास सुरू आहे.   नागपुरच्या आभा नगर परिसरात रविवारी दुपारी एका 8 वर्षांच्या मुलीवर चॉकलेट आणि पैशाचे आमिष देऊन अत्याचार करण्यात आले.  8 वर्षीय चिमुरडी  आपल्या 4 वर्षीय बहिणीसोबत घरी होती. तर त्यांचे आई वडील मजुरी कामावर गेले होते.  रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अंदाजे 40 वर्षीय इसमाने घरी वडील आहे का? अशी विचारणा केली. पीडित मुलीच्या काकाचं नाव घेत मी त्यांना ओळखतो अशी ओळख दाखवली. त्यानंतर छोट्या वर्षीय बहणीला बाहेर ठेवून आत जाऊन 8 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो फरार झाला.

आरोपीने मुलीच्या हातात वीस रुपये दिले अशी माहिती ही पोलीस तपासास समोर आली आहे.  घटनेनंतर रात्री आई वडील आल्यावर मुलीने त्यांना सर्व प्रकार सांगितला.  त्यानंतर पारडी पोलिसात कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्या आरोपीची ओळख पटत नसल्यानं पोलिस यंत्रणेद्वारे आरोपीचे एक स्केच तयार करण्यात आले आहे.   तर बालकल्याण समितीचे अधिकारी दोन्ही बहिणी कडून जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.  दरम्यान पीडित मुलीची प्रकृती ठीक असून तिला त्याच दिवशी वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
मुंबईतील हिवाळ्यातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त बैठक
मुंबई महानगरपालिका आणि एमपीसीबी यांच्या संयुक्त उपस्थितीत वायू प्रदूषण नियंत्रणावर उच्चस्तरीय आढावा बैठक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 29 OCT 2025 : ABP Majha
Maharashtra Rains: 'आधीची नुकसान भरपाई नाही, आता नवं संकट', Beed मध्ये शेतकरी हवालदिल
Clean Chit Politics: 'देवेंद्र फडणवीसांनी ‘येथे क्लीन चिट मिळेल’ असा बोर्ड लावावा'; सुषमा अंधारेंचा घणाघात
Rajan Patil Join BJP : आमदार राजन पाटील, यशवतं मानेंचा भाजपात पक्षप्रवेश
Eknath Shnde Shivsena 2017 मध्ये जिंकलेल्या 84 जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
मुंबईतील हिवाळ्यातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त बैठक
मुंबई महानगरपालिका आणि एमपीसीबी यांच्या संयुक्त उपस्थितीत वायू प्रदूषण नियंत्रणावर उच्चस्तरीय आढावा बैठक
Bacchu Kadu : बच्चू कडू आणि आंदोलकांनी ठिय्या आंदोलन स्थळावरुन बाजूला व्हावं, नागपूर खंडपीठाचे आदेश, बच्चू कडू म्हणतात लोकन्यायालयाचंही ऐकणार...
नागपूर खंडपीठाचे ठिय्या आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश, बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
डॉक्टर तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंची हादरवाणी पत्रकार परिषद, रुपाली चाकणकरांवर हल्ला
डॉक्टर तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंची हादरवाणी पत्रकार परिषद, रुपाली चाकणकरांवर हल्ला
Phaltan Doctor Death: 'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Embed widget