प्रशासनात इतक्या तडकफडकी बदल्या कुणाच्या आदेशानं होतायत? - आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray : मुंबई सोन्याची अंडे देणारी कोंबडी ही त्यांच्यासाठी असेल आमच्यासाठी ही कर्मभूमी आहे
Aaditya Thackeray Press Conference: मुंबई सोन्याची अंडे देणारी कोंबडी ही त्यांच्यासाठी असेल आमच्यासाठी ही कर्मभूमी आहे. गेल्या तीन महिन्यात मुंबईत किती इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट बंद झाले, नवे किती सुरु झालेत ? चांगले काम करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या 90 दिवसात 6 बदल्या झाल्या आहेत. काहींच्या तर 24 तासात बदल्या करण्यात आल्या. प्रशासनात इतक्या तडकफडकी बदल्या होत नाहीत. एवढ्या गोंधळ का होताय? कोणाच्या आदेशाने सगळं हे होताय? यामध्ये खच्चीकरण मुंबईचं होतेय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. आदित्य ठाकरे मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी याआधीही आणि मुख्यमंत्री असताना इतर शहरांच्या तुलनेत मुंबईला प्राधान्य दिलेय. बीएमसीमध्ये तीन गोष्टी घडत आहेत. बीएमसीमध्ये टेंडर , ट्रान्सफर आणि टाईमपास या गोष्टी सुरू आहेत. मुंबईच्या रस्त्यामध्ये 5 हजार कोटी दिले जातील असं मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं आणि रस्ते खड्डे मुक्त होईल असा सांगितलं. पण आता हे ट्रेंडर स्क्रॅप केले आहेत. रस्ते रातोरात खड्डेमुक्त होत नाहीत. एक रस्ता बनविताना 42 युटिलिटीवर काम करावं लागतं. 1 ऑक्टोबर ते 1 जून यामध्ये रस्त्याची काम होत असतात मात्र आता ऑक्टोबर निघून गेला आहे. कधी टेंडर निघणार? कधी काम सुरू होणार? 5 हजार कोटी देऊन सुद्धा लोक का आले नाहीत? टेंडरचं काय झालं ? याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
येत्या पावसाळ्यात मुंबईमध्ये खड्डे पडले तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी या सगळ्यावर बोलायला हवं. 1700 कोटी ब्युटीफिकेशनला वळवले, मात्र यात करायचं काय ? याच्या गाईडलाइन्स नाहीत. मुंबईमध्ये 1700 कोटींचा घोळ झाला आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. खोके सरकारमुळे 5 मोठे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेले नाही. ओला दुष्काळही जाहीर करण्यात आलेला नाही. उद्योग आणि कृषी क्षेत्र राज्यात कोलमडून जात आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
5000 हजार कोटी रस्ते टेंडर, 1700 कोटी ब्युटीफिकेशन प्रोजेक्ट, बदल्या यावर कोणीच काही बोलत नाहीये. मुंबईचं खच्चीकरण खोके सरकार करत आहे. मुंबईत डीसलीनेशन प्रोजेक्ट, सायकल ट्रॅक प्रोजेक्ट या सगळ्याला स्थगिती आलेली आहे ? या प्रोजेक्टचा नेमका काय झालं कोणालाच माहीत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटलेय.