एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसैनिकाकडूनच संजय राऊतांवर शाई फेकीचा प्रयत्न
लखनऊ : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये हा प्रकार घडला. धक्कादायक प्रकार म्हणजे शिवसैनिकानेच शाईफेकीचा प्रयत्न केला. एएनआय या वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. सूर्य भान असं शाई फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.
गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. तिथे आज एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी जात असताना संजय राऊत यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला. दरम्यान, लखनऊ येथील शिवसेना कार्यकारणी पदाधीकाऱ्यामध्ये, स्वागत करण्यावरून आपसात मारामारी झाली. मी आलो त्यावेळी सर्व प्रकरण मिटलं होतं. माझ्या अंगावर कोणीही शाई फेकली नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. उत्तर प्रदेश शिवसेनेती अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर दरम्यान या प्रकरानंतर उत्तर प्रदेशचा शिवसेना संपर्कप्रमुख विनय शुक्ला याला शिवसैनिकांनी जबर मारहाण केली. विनय शुक्ला याने गेली सहा महिने उत्तर प्रदेश शिवसेनापक्षांतर्गत गैरकारभार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील शिवसैनिक संतप्त झाले होते. शिवसैनिकांनी विनय शुक्लाच्या विरूद्ध अनेक तक्रारी करणारे पत्र, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी पाठवले होते. आज लखनऊ येथील गेस्ट हाऊसजवळ विनय शुक्लाच्या गाडीला शिवसैनिकांनी घेराव घालून, त्याला जबर मारहाण केली. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे वादाच्या केंद्रस्थानी आहेत. कारण संजय राऊत हे कार्यकारी संपादक असलेल्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात, मराठा मोर्चाबाबत वादग्रस्त कार्टून छापून आलं होतं. यामुळे राज्यभरात वादाची राळ उठली होती. याप्रकरणी आधी संजय राऊत यांनी माफी मागण्यास टाळाटाळ केली होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर, संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करणारं पत्रक प्रसिद्ध केलं होतं.A Shiv Sena party worker attempts to throw ink at Shiv Sena leader Sanjay Raut in Lucknow (Uttar Pradesh).
— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
Advertisement