एक्स्प्लोर
नागपुरात लग्नाला नकार दिल्याने मेव्हणीवर चाकूहल्ला
नागपूर : नागपुरात एका व्यक्तीने मेव्हणीवर चाकूहल्ला केला. लग्नास नकार दिल्याने त्याने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरील लोकांनी हल्लेखोराला वेळीच अडवल्याने तिचे प्राण वाचले.
मानकापूर परिसरातील झेंडा चौकात काल संध्याकाळी 4.30 ते 5 च्या सुमारास ही घटना घडली. पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपी आवाळेने मेव्हणीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. परंतु तिने नकार दिल्याच्या रागातून आरोपी सिद्धार्थने आवळेने, पाठलाग करुन सतूरने मेव्हणी वंदना कावरेवर वार केले. मात्र रस्त्यावरील दोन तरुणांनी आरोपीला रोखल्याने वंदनाचे प्राण वाचले.
दीड वर्षांपूर्वी वंदना कावरे बाईक चालवत असताना अपघात झाला होता. यात मागे बसलेल्या सिद्धार्थच्या पत्नीचा मृत्यू झाला. तेव्हापासून आरोपी सिद्धार्थने तिच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. पण पुढील वर्षी मार्च महिन्यात वंदनाचं लग्न होणार आहे. त्याच रागातून सिद्धार्थने तिच्यावर चाकूहल्ला केला.
दरम्यान पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ आवळेला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement