एक्स्प्लोर

लग्नसोहळ्यात नियमापेक्षा जास्त वऱ्हाडी जमल्याने नवरदेवावर गुन्हा दाखल

सध्या कोरोनामुळे लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग होऊ नये असा निर्बंध शासनाकडून लावण्यात आलेला आहे. तरी देखील लग्न सोहळ्याला 250 ते 300 जण सहभागी होते.

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढले. जव्हारमध्ये ही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून तो खाजगी दवाखान्याच्या नर्स यांच्या संपर्कातील तथा व्यवस्थापकाच्या लग्न सोहळ्यामुळेच वाढला असून, केळघर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने फिर्याद नोंदविली आहे. आपत्ती व्यवस्थापन नियमांचे भंग करून लग्न सोहळ्यात 50 पेक्षा अधिक लोकांचा जमाव जमवल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असल्यामुळे नवरदेव मच्छिंद्र कोरडे सह अन्य चार व्यक्तीवर जव्हार पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाजगी दवाखान्यातील व्यवस्थापक कोरडे याचा लग्न सोहळा 11 जून रोजी केळघर येथे आयोजित केला होता. सध्या कोरोनामुळे लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग होऊ नये असा निर्बंध शासनाकडून लावण्यात आलेला आहे. तरीही स्वॅबचे नमुने घेतलेले असताना, अहवाल अप्राप्त असताना त्यांनी लग्न सोहळा पार पाडला यात 250 ते 300 लोकं सहभागी झाले होते. त्यामुळे मनाई आदेशाचा भंग करुन, विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केले. विनापरवानगी 50 पेक्षा जास्त लोक हजर होते. तसेच हजर असलेल्या लोकांपैकी बऱ्याच लोकांनी त्यांच्या तोंडावर मास्क अथवा रुमाल लावला बांधला नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव झाला म्हणून भा.दं.वि. कलम 188 अन्वये भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 अ व 135 प्रमाणे नवरदेव व त्यांच्या कुटुंबातील इतर चार अशा 5 व्यक्तींवर जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान तो एका जव्हारच्या एस.टी. महामंडळाच्या चालकाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याचे व इतर पाच व्यक्तींचे स्वॅबचे नमुने 10 जून रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र स्वॅबचे नमुने पाठविले असताना त्यांना शासकीय विलगिकरण कक्षात असणे बंधनकारक होते. मात्र हा कोणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरत होता, त्यांचे लग्न सोहळाही पार पडला आणि न होणारी अघटीत घटना घडली असून, जव्हार तालुक्यात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. आरोग्याशी निगडित असेलेल्या व्यक्तीकडून अशाप्रकारे हलगर्जीपणा होत असल्याने व संबंधित खाजगी दवाखान्यातील उच्चशिक्षित डॉक्टरांकडून स्वाबचे नमुने तपासणीसाठी गेले असताना दवाखाना सुरू ठेऊन रुग्ण तपासणे हे कितपत योग्य आहे, त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात पहिलेच मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्गाला पुन्हा सलग पाच दिवस दुकाने बंद ठेवावी लागत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget