उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ दौरा, शरद पवारांच्या सभेनंतर छगन भुजबळांची पत्रकार परिषद; आज दिवसभरात
9th July Headline : उद्धव ठाकरे त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात विदर्भापासून करणार आहेत. तर शरद पवार यांनी केलेल्या टीकेला छगन भुजबळ पत्रकार परिषद घेत उत्तर देणार आहेत.
9th July Headline : उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) हे महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळच्या दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. तर छगन भुजबळ हे देखील शरद पवारांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे पहिल्यांदाच त्यांच्या आंबेगाव या मतदार संघात जाणार आहेत. पुण्यात हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला होणार सुरुवात
उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. तसेच ते पालकमंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळच्या दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सभा घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे हे अमरावतीसाठी रवाना होणार आहेत.
शरद पवारांच्या टीकेला भुजबळ प्रत्युत्तर देणार
शरद पवारांच्या सभेला छगन भुजबळ उत्तर देणार आहेत. पत्रकार परिषद घेत भुजबळ प्रतिक्रिया देणार आहेत.
वळसे पाटील त्यांच्या मतदारसंघात
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या मतदार संघात जाणार आहेत. आंबेगाव या त्यांच्या मतदारसंघाला वळसे पाटील भेट देणार आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची बैठक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील शरद कृषी भवन बैठक होणार आहे. या बैठकीसाठी आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.
पुण्यासाठी यलो अलर्ट जारी
पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच घाट भागात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. शहरात फार पाऊस नसून घाटमाध्यावर आणि लोणावळ्याच्या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात मान्सूनचा इशारा
राज्यभरात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या गाड्या वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं उशिरा पोहचणार आहेत.