एक्स्प्लोर

नागपूर मेट्रोच्या निर्मितीचा 'जलद' आणि 'स्वस्त' प्रवास

सध्या नागपूर मेट्रोचं काम मोठ्या जलदगतीनं सुरू आहे. पण नागपूर मेट्रोचं काम वेगानं पूर्ण करताना, मेट्रो प्राधिकरणाला तब्बल 800 कोटींची बचत करण्यातही यश आलं आहे. त्यामुळे या यशात गडकरी इफेक्ट तर नाही ना? अशी चर्चा सध्या नागपुरात सुरू आहे.

नागपूर : सध्या नागपूर मेट्रोचं काम मोठ्या जलदगतीनं सुरू आहे. पण नागपूर मेट्रोचं काम वेगानं पूर्ण करताना, मेट्रो प्राधिकरणाला तब्बल 800 कोटींची बचत करण्यातही यश आलं आहे. त्यामुळे या यशात गडकरी इफेक्ट तर नाही ना? अशी चर्चा सध्या नागपुरात सुरू आहे. पुढच्या आठवड्यात नागपूर मेट्रोची चाचणी होणार आहे. त्यामुळे मेट्रोनं प्रवास करण्यासाठी राज्याची उपराजधानी सज्ज झालीय. विशेष म्हणजे, कामाच्या वेगामुळं, आणि योग्य नियोजनामुळं नागपूर मेट्रो प्रकल्पाची किंमत तब्बल 800 कोटींनी कमी झाली आहे. यात डीपीआर म्हणजेच, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्टनुसार नागपूर मेट्रोचा खर्च 8 हजार 660 कोटी इतका होता. त्यात 10 टक्क्यांची बचत करण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे. वास्तविक, देशातल्या इतर मेट्रोच्या निर्मितीसाठी प्रति किलोमीटरमागे 200 ते 250 कोटी खर्च येतो. मात्र नागपूर मेट्रोसाठी हाच खर्च फक्त 170 ते 180 कोटींच्या घरात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी करण्यासाठी नागपूर मेट्रोनं लढवलेली शक्कल खरचं कौतुकास्पद आहे. बचतीसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनवण्यात आलेल्या मेट्रोच्या डब्यांच्या देखभालीवर आणि धुलाईवर कमी खर्च होणार आहे. शिवाय दोन टोकांवरुन विद्युतपुरवठा करण्याऐवजी, नागपूर मेट्रोला मध्यातून विद्युत पुरवठा करण्यात येतोय. तर 6 कोचऐवजी 3 कोच असल्यामुळं स्टेशनच्या निर्मितीवरही कमी खर्च येतो आहे. तसंच, अधिग्रहण करण्यात येणारी जमीन शासकीय असल्यामुळं फक्त 60 कोटी मोजावे लागणार आहेत. दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे, या दोन्ही शहरांमधल्या मेट्रोवर मोठा खर्च होत आहे. त्यातच या दोन्ही शहरांमधील मेट्रो प्रकल्पाचं काम देखील चांगलच रखडलंय. त्यामुळं मुंबई आणि पुणे मेट्रोनं नागपूर मेट्रोकडून नियोजनाचे धडे शिकायला काहीच हरकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Embed widget