एक्स्प्लोर
Advertisement
सांगलीतल्या 'त्या' आठही पोलिसांची CID चौकशी होणार : विश्वास नांगरे पाटील
कोल्हापूर : अट्टल चोरटा मैनुद्दीन मुल्ला याला हाताशी धरून वारणा शिक्षण संकुल परिसरात कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या सांगलीच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याची CID मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते.
गेल्या वर्षी मैमुद्दीन मुल्ला या अट्टल चोरट्याने वारणा कोडोली इथल्या शिक्षण समूहाच्या शिक्षक कॉलनीतुन 3 कोटी रुपयांची रक्कम मिरज इथं लपवून ठेवली होती, ही माहिती सांगली पोलिसांना कळताच तपासाच्या नावाखाली सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्या सोबत रवींद्र पाटील, दीपक पाटील, शंकर पाटील, प्रवीण सावंत या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वारणेत येऊन 6 कोटींची रक्कम चोरून नेली.
याची माहिती त्याचे वरिष्ठ अधिकारी विश्वनाथ धनवट यांनी पुन्हा दुसऱ्या पोलीसांचं दुसरं पथक तयार करत दिपक पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरपळकर याना घेऊन पुन्हा वारणा नगर येथे येऊन 3 कोटी 18 लाखावर डल्ला मारला या प्रकरणाची फिर्याद कोल्हापुरातील बांधकाम व्यवसायिक झुंझार सरनोबत यांनी वारणा इथल्या कडोली पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला असून याची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
या प्रकरणात दोषी असणाऱ्या सांगलीच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याची CID मार्फत चौकशी केली जाणार आहे.
सांगली पोलिसांच्या या कारनाम्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची नाचक्की झाली असून या प्रकरणात पारदर्शीपणे चौकशी होणार असल्याचंही विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातमी : चोरट्याला हाताशी धरुन सांगली पोलिसांचा कोट्यवधी रुपयांवर डल्ला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
क्रीडा
Advertisement