एक्स्प्लोर
चंद्रपूरमध्ये कांद्याच्या ट्रकमधून 70 पेट्या दारुसाठा जप्त
नागपूर- चंद्रपूर मार्गावर लखमापूर येथे कांद्याच्या ट्रकमधून 70 दारुच्या पेट्या आणि मुद्देमालासह 15 लाख रुपये किंमतीची दारु जप्त केली आहे.

चंद्रपूर : उद्याच्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दारूच्या नशेत तळीरामांनी धिंगाणा घालू नये, यासाठी पोलिसांनी दारूची वाहतूक रोखली आहे. मात्र, इतक्या बंदोबस्तातही चंद्रपूरात दारुची अवैधपणे वाहतूक करणारा एक ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. नागपूर- चंद्रपूर मार्गावर लखमापूर येथे एका शेतमाल भरून असलेल्या पिकअप वाहनाला अडविले. या वाहनात कांदा भरून असल्याने कुणाला फारसा संशय आला नाही. मात्र, वजन काट्यावर अनपेक्षित वजन भरल्याने पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी ट्रकचा कसून तपासणी केला असता, हा प्रकार समोर आला. पोलिसांनी 70 दारुच्या पेट्या आणि मुद्देमालासह 15 लाख रुपये किंमतीची दारु जप्त केली असून, दोघांना ताब्यात घेतलं आहे. शेतमालाच्या ट्रकमधून अवैध दारुची तस्करी होत असल्याने पोलिसांच्या चिंता वाढल्या आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत























