एक्स्प्लोर

दुष्काळात माणुसकीही आटली! सावरगावात 7 जातींच्या 7 विहिरी

नांदेड : माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जात-धर्म हा त्याला चिकटलेला असतो. त्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी विविध जातींच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी असल्याचं आपण पहिले आहे. पण जातींच्या वेगळ्या स्मशानभूमीप्रमाणे वेगळे पाणवठे असल्याच कधी तुम्ही ऐकलं आहे का? पण नांदेड जिल्ह्यातील एका गावात जातीनिहाय विहिरी आहेत आणि इथले नागरिक आपल्या जातीप्रमाणे विहिरींवर जाऊन पाणी भारतात.   2   7 जातींच्या 7 वेगवेगळ्या विहिरी   सावरगाव हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गाव. सुमारे 5 हजार लोकवस्तीच्या या गावात मराठा, बौद्ध, मातंग, लिंगायत, आदिवासी अशा अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. गावात निजामाने एक तलाव बांधला होता, जो आता पूर्ण आटला आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने टँकर दिला आहे. पण तो अपुरा पडतो. त्यामुळे इथल्या लोकांना 2 किलोमीटर पायपीट करुन पाणी आणावे लागते.     तंटा होऊ नये म्हणून....   पाणी टंचाई घालवण्यासाठी गावकऱ्यांनी निजामकालीन तलावात विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्येक जातीने आपापली विहीर खोदायची, असा सर्वानुमते निर्णय झाला. प्रत्येक जातीने आपल्या विहिरीसाठी निधी दिला. त्यातून आता 7 विहिरी खोदल्या गेल्या आहेत. ज्या जातीची विहीर, त्याच जातीच्या लोकांनी त्या विहिरीतून पाणी घ्यायचे, असा नियम आहे. तंटे होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचं गावकरी सांगतात.   5   पाणी चोरु नये म्हणून 24 तास पहारा....   काही विहिरींना अधिक पाणी आहे, तर काही विहिरींना कमी पाणी आहे. त्यामुळे दुसऱ्या जातीने आपल्या विहिरीतील पाणी चोरु नये, यासाठी प्रत्येक जातीने आपल्या विहिरींवर पहारा ठेवला आहे. ज्या जातीची विहीर आहे, त्या जातीची 2 माणसे त्या विहिरीवर 24 तास पहारा देतात.   दुष्काळातही जातीच्या भिंती कोसळत नाहीत?   दुष्काळात अनेक गावातील जातींच्या भिंती कोसळल्या आहेत. सांगलीकरांनी लातूरकारांना पाणी देताना जाती धर्माचा विचार अजिबात केला नाही. सरकारही तसा विचार करत नाही. पण नांदेड जिल्ह्यातील सावरगाव मात्र याला अपवाद ठरतं आहे. कदाचित संपूर्ण राज्यात जातीनिहाय विहीर असलेल, हे एकमेव गाव असावं.   दुष्काळात पाणी आटलं, पण माणुसकीचा झरा जिवंत ठेवायला हवा. पण तंटा नकोच्या भूमिकेतून वेगळ्या विहिरी खोदणाऱ्या सावरगाव वासियांना हे कुणी सांगाव?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Vidhan Parishad Election 2026: रात्री दीड वाजता बैठकीत विक्रम काकडेंचं नाव पक्कं झाल्याची चर्चा, पण सकाळ उजाडली तरी एबी फॉर्मच मिळाला नाही, पुणे विधानपरिषदेच्या जागेचा सस्पेन्स पुन्हा वाढला
रात्री दीड वाजता बैठकीत विक्रम काकडेंचं नाव पक्कं झाल्याची चर्चा, पण सकाळ उजाडली तरी एबी फॉर्मच मिळाला नाही, पुणे विधानपरिषदेच्या जागेचा सस्पेन्स पुन्हा वाढला
Sanjay Raut On Bjp: नरेंद्र मोदींनी मला तो मुद्दा सांगितल्यास मी भाजपमध्ये जाणार- संजय राऊत
Sanjay Raut On Bjp: नरेंद्र मोदींनी मला तो मुद्दा सांगितल्यास मी भाजपमध्ये जाणार- संजय राऊत
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचे पुन्हा 'धक्कातंत्र', अल्पसंख्याक चेहऱ्याला परभणी-हिंगोली विधान परिषदेची उमेदवारी; कोण आहेत सईद खान?
एकनाथ शिंदेंचे पुन्हा 'धक्कातंत्र', अल्पसंख्याक चेहऱ्याला परभणी-हिंगोली विधान परिषदेची उमेदवारी; कोण आहेत सईद खान?

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Embed widget