एक्स्प्लोर
धुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी 60टक्के मतदान; उद्या जाहीर होणार निकाल
धुळे जिल्हा परिषद चार पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं असून मतमोजणी 8 जानेवारीला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे
धुळे : जिल्हा परिषद चार पंचायत समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाची सत्ता येणार हे काही तासांत स्पष्ट होणार आहे. 56 गट 112 गणांपैकी आता केवळ 51 गट 110 गणांसाठी मतदान झालं. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी थंडीच्या प्रभावामुळे मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह कमी होता, मात्र दुपारी तीन नंतर मतदार केंद्रावर रांगा लागल्या होत्या. विशेषतः साक्री, शिरपूर भागातील दुर्गम भागात मतदारांचा उत्साह चांगला दिसून आला. 2013च्या तुलनेत 2020मध्ये झालेल्या या निवडणुकीत 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. 2013 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत 55 टक्के मतदान झालं होतं. विधानसभा निवडणुकीत 60 टक्के मतदान झालं होतं. मतमोजणी 8 जानेवारीला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे, धुळे येथे मतमोजणी नगावबारी परिसरात असलेल्या शासकीय गोदाम याठिकाणी, तर शिरपूर, साक्री, शिंदखेडा याठिकाणी तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी दोन पर्यंत सर्व निकाल जाहीर होईल असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. धुळे ,साक्री येथील मतमोजणीसाठी प्रत्येकी 17टेबल , शिरपूर येथे 14 तर शिंदखेडा येथे 10 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. दरम्यान, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाअखेर पाच गट दोन गण बिनविरोध झाल्यानं आता 51 गट 110 गणांसाठी झालेल्या मतदाना अंती मतमोजणी होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ .सुभाष भामरे, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री आशिष देशमुख, मंत्री धनंजय मुंडे, आमदार गुलाबराव पाटील, आमदार दादा भुसे या आजी माजी मंत्र्यांच्या सभेला मतदारांनी कसा प्रतिसाद दिला हे मतमोजणी अंती स्पष्ट होणार आहे. संबंधित बातम्या : परभणीत महाविकास आघाडी पॅटर्न यशस्वी, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला विटेकर लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी भाजपची बाजी, तर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















