एक्स्प्लोर
पोलिस निरीक्षकाला मारहाण करणारे शिवसैनिक अटकेत
पुणे : पुण्यातील भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मारहाण करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले सर्व जण शिवसैनिक आहेत.
गणेश वाडकर, महेश कोंडे, अमित कोंडे, प्रकाश धुमाळ, शुभम खुटवड आणि संदीप खुळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
भोर तहसीलदार कार्यालयाबाहेर सोमवारी श्रीकांत खोत यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली होती. सुदैवाने त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र खाकी वर्दीवर हात उचलल्याने संताप व्यक्त होत आहे.
भोरमध्ये पोलिस निरीक्षकाला राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची मारहाण
काय आहे प्रकरण?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. शिवसेनेतर्फे ज्या उमेदवाराला बी फॉर्म देण्यात आला होता, त्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केला, त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांचा तिळपापड झाला. परिणामी तिथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
याच जमावाला आवरण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत एकटे मैदानात उतरुन त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण एकाचवेळी कार्यकर्त्यांचा उन्मत्त जमाव त्यांच्यावर धावून आला आणि खोत यांना मारहाण केली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवलं आणि खोत यांची सुटका केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement