एक्स्प्लोर
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी 50 लाखांचं अर्थसहाय्य; क्रीडामंत्र्यांची घोषणा
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी केली आहे.
मुंबई : टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी केली आहे. शेलार यांच्या उपस्थितीत पुण्याच्या बालेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी शेलार यांनी आगामी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत आणि तिरंदाज प्रवीण जाधव या दोनच खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट कन्फर्म केले आहे. राहीने पिस्टल नेमबाजीत, तर प्रवीणने सांघिक तिरंदाजीत पात्रता निकष गाठला आहे. त्यामुळे आगामी टोकियो ऑलिप्मिकमध्ये महाराष्ट्राच्या या दोनच खेळाडूंना पाहण्याची संधी मिळणार आहे.
24 जुलै 2020 ते 9 ऑगस्ट 2020 दरम्यान जपानची राजधानी टोकियो या शहरात ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Prize distribution to sports tournament achiever at Balewadi pune ! pic.twitter.com/QdlYqtLYqh
— ashish shelar (@ShelarAshish) August 12, 2019
Reviewed all the sports facilities at Balewadi pune with Anjali Bhagwat ji ! pic.twitter.com/Dgiu08Hhul
— ashish shelar (@ShelarAshish) August 12, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement