एक्स्प्लोर
नागपुरात 24 तासात 3 हत्या, हप्तावसुलीला विरोध, तरुणाची हत्या

नागपूर: नागपूरमध्ये गेल्या 24 तासात 3 जणांची हत्या करण्यात आली आहे. काल नागपुरच्या तांडापेठ भागात हप्तावसुलीला विरोध करणाऱ्या एका युवकाची गुंडानी सर्वांच्यादेखत हत्या केली. संजय खापेकर असं या तरुणाचं नाव आहे. तांडापेठ भागात अनेक कारखाने आहेत. इथे स्थानिक गुंड हप्तावसुलीसाठी स्थानिकांना सतत हैराण करत असतात. 16 तारखेला राधेश्याम खोब्रागडे, शुभम बोणेकर आणि इतर गुंड संजय खापेकर काम करत असलेल्या कारखान्यात आले आणि त्यांनी महिना 4 हजार रुपयांचा हप्ता मागितला. यावेळी संजयने या गुंडाना विरोध केला. त्यानंतर संजयने आपल्या इतर साथीदारांनाही या गुंडाना भीक न घालण्यास सांगितलं. त्यामुळे परिसरात आपली दहशत कमी होईल या भितीतून या गुंडानी भर रस्त्यात संजय खापेकरची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह 3 आरोपींना अटक केली आहे.
आणखी वाचा























