एक्स्प्लोर

नाशिकमध्ये कोरोनामुळे 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधील पहिलीच घटना आहे.

नाशिक : लहान मुलांसाठी देखील कोरोनाची लस येणार का? हा प्रश्न विचारण्यामागचे कारण म्हणजे नाशिक शहरातील एक धक्कादायक घटना. लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक नसल्याचं जरी निदर्शनास येत असलं तरी मात्र नाशिकमध्ये एका 3 महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याला इतरही काही गंभीर आजार होते. सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधील पहिलीच घटना आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी एबीपी माझाशी बोलतांना दिलेल्या माहितीनुसार, एका 3 महिन्याच्या बाळाला इतरही काही दुर्धर आजार होते. त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया देखील पार पडली होती. तसेच कोरोनाची लागण झाल्याने उपचारादरम्यान एका रुग्णालयात या बालकाचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यातील ही घटना असून सर्व अहवाल तपासल्यानंतर शासनाच्या पोर्टलवरही याबाबत माहिती दिली गेली आहे. शहरात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्ण 70 हजार 600 आहेत. त्यापैकी 3 हजार 300 रुगणांचे वय हे दहा वर्षाच्या आतील आहे. यावरूनच लहान मुलांना लागण होण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे घाबरण्याच काहीही कारण नाही मात्र काळजी घ्या, लहान मुलांना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळा त्यांची विशेष काळजी घ्या असं नाशिककरांना त्यांनी आवाहन केलय. दरम्यान लहान मुलांमध्ये कोरोनाची कोणती लक्षणं दिसून येतात ? कसे उपचार केले जातात ? कशी काळजी घ्यावी ? या प्रश्नांची उत्तरं आम्ही नाशिकमधील नामांकित बालरोग तज्ज्ञ मिलिंद भराडीया यांच्याकडून जाणून घेतली आहेत. भराडीया म्हणाले, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो. सर्दी, खोकला, ताप तसेच उलट्या, जुलाब, पोट दुखणे आणि अशक्तपणा अशीही लक्षणं मुलांमध्ये आढळून येतात. लक्षणं सौम्य असतील तर होम क्वारंटाईन करत व्हिटॅमिन सी, झिंक आणि त्या वेळच्या गरजेनूसार औषधे दिली जातात मात्र कोरोनाचा धोका अधिक असेल तर रुग्णालयात दाखल करून उपचार करणे गरजेचे असते, वेळ पडल्यास स्टेरॉईड तसेच रेमडीसीव्हीरचाही डोस दिला जातो. कोविड 19 झाल्यानंतर एक महिन्यांनी अनेक लहान मुलांमध्ये कावासाकी नावाच्या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत त्यामुळे कोरोनाचे वेळीच निदान करणे आणि योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे, लक्षणं दिसताच RTPCR चाचणी आणि रक्ताच्या तपासण्या कराव्यात. काही मुलांना जन्मतः ह्रदयरोग, किडनीचा आजार किंवा जन्मापासूनच एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर अशा बालकांची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. तसे बघितले तर कोरोनामुळे लहान मुलांचं मृत्यू होण्याचं प्रमाण जगभरात खूप कमी आहे आणि ह्याला कारण म्हणजे त्यांच्यात कोमॉरबीडीटी खूप कमी असते तसेच आपल्याकडे वेळोवेळी लसीकरण केले जाते महत्वाचं म्हणजे भारतात लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती अधिक चांगली आहे. एकंदरीतच नाशिकमधील या घटनेमुळे आरोग्य विभाग आता अधिक सतर्क झालाय. एकीकडे भारतात कोरोना लस हा चर्चेचा विषय ठरत असून सर्वच जण या लसीच्या प्रतीक्षेत असतानाच लहान मुलांसाठी देखिल कोरोनाची लस येणार का ? असा प्रश्न नाशिकमधील या घटनेमुळे आता उपस्थित केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Embed widget