एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

3 February Headlines : मराठी साहित्य संमेलनाला वर्ध्यात सुरुवात, पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; आज दिवसभरात

3 February Headlines :  आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घटना घडणार आहेत, याबाबत जाणून घ्या...

3 February Headlines :  वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन असणार आहे. तर कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. कुणाला उमेदवारी मिळणार? याबाबत चर्चा सुरु आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण सकाळी 9 वाजता भाजपच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना बजेट संदर्भात माहिती देणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वर्ध्यात सुरुवात 
वर्धा - आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वर्ध्यात सुरुवात होत आहे... सकाळी 8 वाजता ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार असून 10 वाजता संमेलन स्थळी ध्वजारोहण होणार आहे... तर 10.30 वाजता उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्यात संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.. 

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन -

पुणे -  नवीन वर्णनात्मक अभ्यास २०२३ पासूनच लागू करावा या मागणीसाठी सकाळी १० वाजता MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन...  आता MPSC च्या विद्यार्थ्यांकडून UPSC च्या धर्तीवर परिक्षा घेण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे… आज सकाळी 10 वाजता पुण्यातील अलका चौकात त्यासाठी विद्यार्थी एकत्र जाणार आहेत… तीनच दिवसांपुर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रमानुसार 2025 पर्यंत परिक्षा नकोत यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं… त्यानंतर सरकारकडून 2023 एवजी 2025 पासून नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा घेण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं… मात्र विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाची याच्या नेमकी उलटी मागणी आहे... नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा 2025 पासून नव्हे तर 2023 पासूनच घेण्यात याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्याचसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे  

महाविकास आघाडीची बैठक -

पुणे - कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा उमेदवार निश्चीत करण्यासाठी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. तर पुण्यात सकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे आणि सचिन आहिर देखील उपस्थित रहाणार आहेत. दोन्हीही मतदार संघाच्या उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. 

भाजपचीही बैठक -
सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचीही कसबा पोटनिवडणुकी संदर्भात बैठक होणार आहे. महाविकास आघाडीत जागा मिळाव्यात यासाठी रस्सीखेच असल्याच पहायला मिळतय... दोन्हीही जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय होणार का, बैठकीनंतर तिघेही निर्णयाला पोहचणार का याकडं सर्वांच लक्ष

यवतमाळ - यवतमाळचे शिल्पकार रामू चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज यांचा पंचधातूचा अश्वारूढ पुतळ्याचे निर्माण केले आहे... या पुतळ्याचे आझाद मैदान मधून सजविलेल्या ट्रॅक मधून पोहरादेवी कडे प्रस्थान होणार आहे... यावेळी  सेवभाया बाईक रॅली काढून काढणार आहे, यावेळी जिल्हाभरातील शेकडो युवक मोटारसायकल रॅलीत सहभागी होणार आहे... यावेळी लेंगी पथक आणि ढोलताशांच्या गजरात हा पुतळा पोहरादेवी कडे नेण्यात येणार आहे. 
 
वाशिम : यवतमाळ इथं निर्माण केलेला संत सेवालाल महाराज यांचा पंचधातूचा अश्वारूढ पुतळ्याचे पोहरादेवी इथं दुपारनंतर आगमन होणार आहे… शेकडो मोटारसायकल रॅलीच्या उपस्थितीत होणार दाखल

दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशात अदाणी प्रकरणावरून आजही गोंधळ होण्याची शक्यता... सकाळी 10 वाजता विरोधी पक्षांच्या नेत्यांची रणणीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे... राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरही चर्चा प्रस्तावित आहे...  

दिल्ली – केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण सकाळी 9 वाजता भाजपच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना बजेट संदर्भात माहिती देणार आहेत... संसद भवनाच्या लायब्रररी बिल्डींगमध्ये सितारमण खासदारांना मार्गदर्शन करतील.

दिल्ली – मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश रॅली प्रकरणी सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे... याचिकेत सांगीतल आहे की रॅलीत चिथावणीखोर भाषण केली गेली... 5 फेब्रुवारीला पुन्हा असा कार्यक्रम होणार आहे त्यावर बंदी घालावी अशीही मागणी करण्यात आलीय.

दिल्ली – 2002 गुजरात दंगा प्रकरणी बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवर सरकारकडून लावलेल्या बॅनवर सुप्रिम कोर्टात सुनावणी... वकिल एल एम शर्मा आणि वरीष्ठ पत्रकार एन राम यांनी वेगवेगळ्या याचिका दाखल करून बॅन हटवण्याची मागणी केलीय.

कोल्हापूर - ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये 30 तास चौकशी केल्यानंतर पाच अधिकाऱ्यांना सोबत नेलं आहे... याच्या विरोधात आज बँकेचे कर्मचारी सकाळी 10 वाजता बॅंकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणार आहेत... 

नाशिक - शुभांगी पाटील आजपासून मुंबई आझाद मैदानात आंदोलनासाठी बसणार आहेत.

शिंदे गटाचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्या ठाकरे गटाच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज सकाळी दहा वाजता पाचोरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार
 
भंडारा - आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. तृण भरड धान्याचे आहारात खूप महत्व आहे. आहारात त्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रेरीत करण्याच्या दृष्टीने आज सकाळी 9.30 वाजता क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार असून रॅली तालुका कृषि अधिकारी, कार्यालय, सिव्हील लाईन्स ते जिल्हा क्रिडा संकुल पर्यंत आयोजीत करण्यात आली आहे

भंडारा - शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार सुधाकर आडबले यांची भव्य रॅली भंडारा शहरात पोहचत आहे... महाविकास आघाडीच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आलय

कृष्णगुरु एकनाम आखाडा कीर्तनात पंतप्रधान मोदी सहभागी  होणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी बारपेटा, आसाम येथे जागतिक शांततेसाठी 3 फेब्रुवारी रोजी आयोजित कृष्णगुरु एकनाम आखाडा कीर्तनात संध्याकाळी 4:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान कृष्णगुरु सेवाश्रमाच्या भाविकांना याप्रसंगी संबोधित करणार आहेत. परमगुरु कृष्णगुरु ईश्वर यांनी आसाममधील बारपेट येथील नास्तरा या गावी 1974 मध्ये कृष्णगुरु सेवाश्रमाची स्थापना केली. ते महान वैष्णव संत श्री शंकरदेवांचे अनुयायी असलेल्या महावैष्णव मनोहरदेवांचे नववे  अनुयायी आहेत. जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तन या महिनाभर चालणाऱ्या कीर्तनाला 6 जानेवारीपासून कृष्णगुरु सेवाश्रम येथे आरंभ होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Embed widget