सांगलीतील 'त्या' चार कोरोना बाधितांच्या संपर्कात 29 जण, जवळचे 7 नातेवाईक आयसोलेशनमध्ये दाखल
प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे. मात्र या सर्वांच्यावर आरोग्य यंत्रणा ही नजर ठेवून आहे.
सांगली : सांगलीमध्ये सापडलेल्या चार कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात तब्बल 29 जण संपर्कात आल्याची माहिती आता पर्यंत प्राप्त झाली आहे. तसेच यापैकी कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळच्या सात नातेवाईकांना ताब्यात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने उपचासाठी दाखल केले. मात्र अद्याप पर्यंत कोरोनाची कोणतीही लक्षण यापैकी कोणालाही आढळून आले नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले आहे.
सौदी अरेबियातून सांगलीच्या इस्लामपूर मध्ये परतलेल्या चार प्रवाशांना कोरानाची लागण झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा प्रशासनाकडून तातडीने शोध सुरू करण्यात आला होता आणि यामध्ये या रुग्णांच्या संपर्कात तब्बल 29 जण आत्तापर्यंत आल्याचं समोर आले आहे. तर त्यापैकी कोरोनाबाधीत रुग्णांच्या जवळच्या सात नातेवाईकांना जिल्हा आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात आले असून त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आयसोलेशन वार्डत दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे. मात्र या सर्वांच्यावर आरोग्य यंत्रणा ही नजर ठेवून आहे. त्याचबरोबर जे चार कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यांचा इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांशी संपर्क आल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून सर्व ती खबरदारी आणि उपाययोजना करण्यात येत आहेत,अशी माहितीही डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.
भारतात जीवघेणा कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढतच आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 499 वर पोहोचला आहे. आतापर्यंत या व्हायरसने 10 लोकांचा जीव घेतला आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून सर्वाधिक 107 कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत. तर तीन जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त केरळमध्ये असून एकूण 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर केरळमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या व्हायरसला रोखण्यासाठी देशभरातील 30 राज्य लॉकडाऊन करण्यात आली आहेत. पंजाब, महाराष्ट्र आणि चंडीगढमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
coronavirus | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण
भिवंडीत होम कोरेन्टाईन संशयितांची नागरीकांना भीती, कारवाई करण्यात प्रशासन अपयशी
बाहेरुन येणाऱ्यांची तपासणी, दिवसाआड औषध फवारणी; कोल्हापुरातील माणगावाचा स्तुत्य उपक्रम
#Corona Death | महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी, कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू