![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
तेलंगाणा, आंध्रात अडकलेले चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील 26 हजार मजूर परतणार
तेलंगाणा आणि आंध्राप्रदेश राज्यात अडकलेले चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील 26 हजार मजूर लवकरच स्वगृही परतणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
![तेलंगाणा, आंध्रात अडकलेले चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील 26 हजार मजूर परतणार 26,000 laborers from Chandrapur and Gadchiroli districts in Telangana and Andhra Pradesh will return soon तेलंगाणा, आंध्रात अडकलेले चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील 26 हजार मजूर परतणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/01233032/Mathadi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंद्रपूर : तेलंगाणा आणि आंध्राप्रदेश राज्यात अडकलेले महाराष्ट्रातील सुमारे 26 हजार मजूर लवकरच स्वगृही परतणार आहेत. राज्याची टास्क फोर्स याबाबत संबंधित राज्यांशी चर्चा करत आहेत. लवकरचं सुमारे 450 बसेसच्या माध्यमातून मजुरांना राज्यात आणले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. इतर राज्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, पर्यटक, कामगार यांना परत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रानेही यासाठी काही सूचना दिल्या आहे. त्यानुसार संबंधित राज्यांशी बोलणी सुरू आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोलीतील 26 हजार मिरची तोडणी मजूर हे तेलंगाणा आणि आंध्राप्रदेशमध्ये अडकले आहेत. त्यांना लवरकच परत आणले जाणार आहे.
आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 26 हजार मजूर परतीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व मजुरांची अवस्था तिथल्या शेत शिवारात दयनीय झाली आहे. गेले दीड महिना हे सर्व मजूर महाराष्ट्र सरकारकडे परतीची व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत. राज्य शासनाने आंध्र व तेलंगाना राज्याशी चर्चा करत यातून मार्ग काढला आहे. राज्यात या मजुरांना परत आणण्यासाठी एका टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. सुमारे 26 हजार मजुरांना चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आणले जाणार आहे. यासाठी 450 बसेस तेलंगाना व आंध्र प्रदेशात जाणार असून येत्या काही काळात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
देशभरात अडकलेल्या लोकांना स्वगृही पोहचवण्यासाठी आजपासून 'श्रमिक विशेष' रेल्वे चालणार!
मजुरांना होम क्वॉरंटाईन करण्यात येणार हे सर्व मजूर जिल्ह्यात परत आल्यावर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. यातील मजुरांनी नियम मोडल्यास रोख दोन हजार रुपये दंडाची शिक्षा केली जाणार आहे. यासोबतच एवढ्या मोठ्या संख्येतील मजूर परतल्यावर त्यांना गावाने कोरोना संबंधी खबरदारी घेण्यासाठी पाच सूत्री नियमावली आखली जाणार आहे. राज्य शासनाच्या या पुढाकारामुळे शेत शिवारात- चिखलात -उन्हात तापत असलेल्या व अन्न-पाणी यांची सोय नसलेल्या मजुरांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र दिनीच मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले; केंद्र सरकारचा निर्णय
आज देशभरात श्रमिक स्पेशल ट्रेन चालणार लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी 'कामगार दिन' म्हणजे आजपासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Lockdown | रुग्णालयाच्या मनमानी बिलांना चाप लावण्यासाठी सरकारकडून दर निश्चिती : राजेश टोपे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)