एक्स्प्लोर

देशभरात अडकलेल्या लोकांना स्वगृही पोहचवण्यासाठी आजपासून 'श्रमिक विशेष' रेल्वे चालणार!

लॉकडाऊनमुळे देशातील कानाकोपऱ्यात अडकलेल्या लोकांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामगार दिनाचे निमित्त साधून आजपासून श्रमिक स्पेशल रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी 'कामगार दिन' म्हणजे आजपासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

अशा अडकलेल्या लोकांना पाठवणे किंवा स्वगृही आणण्यासाठी प्रोटोकॉलनुसार संबंधित दोन्ही राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या एकाच ठिकाणी चालवल्या जातील. या श्रमिक स्पेशलच्या समन्वय आणि सुरळीत कारभारासाठी रेल्वे आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यांच्या विनंतीनुसार रेल्वे चालणार प्रत्येक राज्याने प्रवाश्यांना पाठवण्याअगोदर त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. जे निरोगी प्रवासी आहेत, अशानांच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. सोबतचं या प्रवाशांच्या तुकड्या करुन पाठवण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्या सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घालणे बंधनकारक असेल. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय प्रारंभीच्या स्टेशनवर पाठविणार्‍या राज्यांद्वारे करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दिनीचं मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले; केंद्र सरकारचा निर्णय

इच्छितस्थळी पोहचल्यानंतर पुन्हा तपासणी होणार प्रवाशांच्या सहकार्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन व स्वच्छता ठेवण्यासाठी रेल्वे प्रयत्न करणार आहे. लांबचा प्रवास मार्गांवर, रेल्वे प्रवासादरम्यान जेवण पुरवण्यात येणार आहे. आपापल्या राज्यात गंतव्यस्थानावर पोहचल्यानंतर, संबंधित राज्य सरकारकडून प्रवाशांची पुन्हा प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकातून पुढील प्रवासाची सर्व व्यवस्था देखील राज्य करणार आहे. देशाला भेडसावणाऱ्या या संकट प्रसंगी भारतीय रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी देशसेवा करण्यासाठी वचनबद्ध असल्याची माहिती रेल्वेचे कार्यकारी संचालक राजेश दत्त बाजपेयी यांनी दिली आहे.

CM Uddhav Thackeray | 3 मे नंतर झोननुसार मोकळीक देणार : मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget