एक्स्प्लोर

26 February In History : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी, बालाकोट एअर स्ट्राइक; इतिहासात आज...

On This Day In History : सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे.

On This Day In History : सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म नाशिकच्या भगुर येथे झाला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकचे भूषण आहे. जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे सावरकर स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा होते. भगूर येथे सावरकरांचे स्मारक आहे. 'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील सुवर्णपान आहे. विनायाक दामोदर सावरकर हे प्रखर हिंदुत्त्ववादी होते. त्यांना 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक आणि पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली. लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेताना जोसेफ मॅझिनी या इटालियन विचारवंताच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर सावरकरांनी केले. भाषांतराला सावरकरांनी दिलेली प्रस्तावना भारतीयांसाठी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान ठरली. त्या काळी अनेक क्रांतीकारकांना ही प्रस्तावना पाठ होती. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले म्हणून सावरकर यांची बॅरिस्टर पदवी काढून घेण्यात आली. भाषाशुद्धीकरणासाठी सावरकरांनी मोठे काम केले. मराठी भाषेला दिनांक, महापौर असे 45 मराठी शब्द त्यांनी दिले. विनायक दामोदर सावरकर यांनी 83व्या वर्षी १ फेब्रुवारी 1966 पासून अन्न, औषध, पाणी या सर्वांचा त्याग केला. हळूहळू त्यांची प्रकृती खालावली आणि 26 फेब्रुवारी 1966 त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

1887 : भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची पुण्यतिथी (India's First Female Doctor Anandibai Joshi)

आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी क्षयरोगाने त्यांना गाठलं. आजारपणाशी लढा देतादेता 26 फेब्रुवारी 1887 साली आनंदीबाई यांचे निधन झाले. अमेरिकेच्या येथून त्यांनी वैद्यकशास्त्राची पदवी मिळवली. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचं कौतुक झालं. यमुना हे आनंदीबाईचे माहेरचे नाव. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने मुलीच्या भावी आयुष्याचा विचार करता यांनी तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरीत असलेला पण तब्बल 20 वर्ष मोठ्या बिजवर गोपाळ जोशी यांच्या सोबत त्यांचा विवाह झाला आणि यमुना आनंदी जोशी झाली. गोपाळराव जोशी यांचा हट्ट होता की, त्यांच्या पत्नीने उच्च शिक्षण घ्यावं आणि इंग्रजी भाषा ही यायलाच पाहिजे. त्यासाठी जितकी मेहनत आनंदीबाईंनी घेतली. तितकीच मेहनत गोपाळरावांनीही घेतली. त्यांना अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणे हे सोपे नव्हते. सुरुवातीला आनंदीबाईंना यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल असे सांगण्यात आले. मात्र काहीही झालं तरी डॉक्टर ही पदवी आनंदीबाई जोशी या हिंदू नावापुढेच लागेल या निर्णयावर त्या ठाम होत्या. महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर बंगालमध्ये कॉलेजमध्ये त्यांनी काही धडे गिरवले. पुढे अमेरिकेमध्ये वैद्यशास्त्राची पदवी मिळवणार्‍या आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

1937 : मनमोहन देसाई जन्मदिन 

बॉलिवूडमध्ये 'मांजी' म्हणून प्रसिद्ध असलेले मनमोहन देसाई यांचा आज जन्मदिन आहे. देसाई यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1937 रोजी मुंबईत झाला. मनमोहन 24 वर्षांचे असताना 1960 साली त्यांना त्यांचे भाऊ सुभाष देसाई निर्मित 'छलिया' या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत रोटी, चाचा भटिजा, परवरिश, अमर अकबर अँथनी, धरम वीर, सुहाग, नसीब आणि मर्द यांसारखे चित्रपट केले. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द एका उंचीवर नेण्यात मनमोहन यांचा मोठा हात होता. अमिताभ बच्चन यांनी मनमोहन देसाईंसोबत अनेक यशस्वी चित्रपट केले, पण सर्वात यशस्वी चित्रपट म्हणजे 'अमर अकबर अँथनी', या चित्रपटाने अनेक विक्रम केले. फक्त मुंबई शहरात 'अमर अकबर अँथनी' 25 थिएटरमध्ये सलग 25 आठवडे चालला. 1 मार्च 1994 रोजी मनमोहन देसाई यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड हादरले. घराच्या बाल्कनीतून पडून देसाई यांचा मृत्यू झाला. 

2004: केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची पुण्यतिथी

राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते, थोर नेते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून केंद्रातील गृह, अर्थ, संरक्षण अशी महत्वाची खाती ज्यांनी सांभाळली आणि देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं त्या शंकरराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे.

1994 : कुस्तीपटू बजरंग पुनियाचा जन्मदिन (Bajrang Punia) 

कुस्ती क्षेत्रात भारताचे नाव लौकिक मिळविणारा बजरंग पुनिया हा पेशाने कुस्तीपटू आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियाने कुस्तीत कांस्यपदक जिंकले आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने हे स्थान मिळवले आहे. बजरंग पुनियाने आतापर्यंत अनेक चॅम्पियनशिप सामने जिंकले आहेत. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. बजरंग पुनियाने  2013 मध्ये बुद्धपेस्टच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 60 किलो गटात कांस्यपदक जिंकले. यानंतर 2014 मध्ये बजरंग पुनियाने राष्ट्रीय बोर्ड गेम्समध्ये 61 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारतात इतिहास रचला. पुढे  2017 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. 2017 मध्ये त्याने दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून संपूर्ण जगात आपला ठसा उमटवला. 

2019 : बालाकोट एअर स्ट्राइक (Balakot Air Strike)

2016 प्रमाणेच 2019 मध्येही भारतीय लष्कराच्या जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. पुलवामा येथे झालेल्या या हल्ल्यात 40 CRPF जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर, लोक पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकसारखा बदला घेण्याची मागणी करत होते. यातच आजच्याच 26 फेब्रुवारी 2019 च्या सकाळी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पीओकेमध्ये प्रवेश केला आणि बॉम्बहल्ला केला. बालाकोटमध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याची कानोकान खबरही पाकिस्तानला मिळाली नाही. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले. यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमानेही भारतीय हद्दीत घुसली, ज्यांना भारतीय हवाई दलाने हाकलून लावले. मात्र, यादरम्यान भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान कोसळले आणि ते पाकिस्तानी सीमेवर गेले. काही दिवस कैदेत ठेवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget