एक्स्प्लोर
मराठवाड्यात 25 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त, 82 मृत्यूमुखी

मुंबई : मराठवाड्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मराठवाड्यात सुमारे 25 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. तर पावसादरम्यान 82 जणांचा मृत्यू झाला आहे. 30 सप्टेंबरपासून अतिवृष्टीने 1763 गावे प्रभावित झाली आहेत. तर 762 जणावरं वाहून गेली आहेत, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. मराठवाड्यात आज तब्बल आठ वर्षांनंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागासाठी मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीने प्रभावित गावे नांदेड : 831 लातूर : 888 बीड : 44 मागच्या 24 तासात अतिवृष्टी झालेली महसूल मंडळे जालना राजूर, घनसावंगी परभणी झरी हिंगोली सेनगाव, हत्ता नांदेड किनी बीड आष्टी, कडा, दौलावडगाव, टाकळसिंगी, बनसारोळा, उस्मानाबाद उस्मानाबाद शहर
आणखी वाचा























