एक्स्प्लोर
लग्नाच्या वादातून तरुणीची चाकू भोसकून हत्या
अमरावतीमधील साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनीत प्रतिक्षा म्हेत्रे या २४ वर्षीय तरुणीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे.
अमरावती : अमरावतीमधील साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनीत प्रतिक्षा म्हेत्रे या २४ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. प्रतिक्षाचा लग्नावरून एका मुलाशी वाद होता.
या पार्श्वभूमीवर प्रतिक्षा बुधवारी रात्री पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. मात्र, पोलिसांनी प्रतिक्षाची तक्रार नोंदवून घेतली नाही. याच वादातून आरोपीनं प्रतिक्षावर चाकू हल्ला केला. हल्ल्यानंतर तिला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आज (गुरुवार) संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणात दोन हल्लेखोर आहेत. यातील एकाचं नाव राहुल भड असल्याचं समजतं आहे. दोन्ही आरोपी फरार झाले असून सध्या पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, हल्ला झाला त्यावेळी प्रतिक्षाची एक मैत्रीण तिच्या सोबत होती. मात्र, त्या मैत्रिणीचा पती या प्रकरणात पडण्यास मज्जाव करत असल्याचं समजतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement