24 March Headlines: विधिमंडळात आज अंतिम आठवडा प्रस्ताव, राहुल गांधींसाठी काँग्रेसचे देशभरात आंदोलन; आज दिवसभरात
24 March Headlines: विधानसभेत आज विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे. तर, राहुल गांधी यांनी सुनावलेल्या शिक्षेवरून दिल्लीतील राजकारण तापू शकते. जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
24 March Headlines: विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सूरत कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेवरून आज काँग्रेस संसदेत आक्रमक होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर केलेली टिप्पणी ही ओबीसी समाजाचा अपमान करणारी असून त्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा भाजपने केली आहे. एक नजर आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर...
दिल्ली
- राहुल गांधी प्रकरणावर काँग्रेसचा संसद भवन ते विजय चौक असा मोर्चा निघणार आहे. यात काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य सहभागी होणार आहेत.
विधिमंडळ अधिवेशन
- विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव गुरुवारी होऊ न शकल्याने आज सादर होण्याची शक्यता आहे.
- या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा केली जाईल. यावेळी विरोधकांकडून गंभीर आरोप केले जाण्याची शक्यता आहे
- विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव यावर चर्चेला सुरुवात होणार.
मुंबई
- अमृता फडणवीस प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीची पोलीस कोठडी संपत असल्यानं तिला पुन्हा आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
- राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी येणार आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी होणार आहे.
- हसन मुश्रीफांची तिन्ही मुलं आणि सीएनं अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.
- भाजपचे राहुल गांधींविरोधात राज्यभरात आंदोलनाची हाक, राहुल यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप
छत्रपती संभाजीनगर :
- भाजपा लावणार पाच लाख गाड्यावर छत्रपती संभाजी नगरची स्टिकर फोटो. क्रांती चौकातून होणार सुरूवात
पुणे
- पुण्यातील पुण्येश्वर, नारायणेश्वर आणि शनिवार वाड्याच्या आतमध्ये असलेल्या दर्ग्याबाबत मनसेची पत्रकार परिषद
- पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून मोर्चा, महावितरणने एप्रिल महिन्यापासून चालू वर्षाकरिता 37 टक्के आणि पुढील वर्षी 41 टक्के वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव दिल्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर मोर्चा
सांगली
- पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेची आज अंतिम फेरी होणार आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे.
रत्नागिरी
- ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे कुटुंबीय संध्याकाळी अलिबाग येथील एसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहेत.
कोल्हापूर
- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे जोतिबा डोंगरावर जाणार आहे. शिंदे कुटुंब जोतिबा देवाचे ते हक्कदार असून भाविकांसोबत महाप्रसाद घेणार आहेत.
नाशिक
- नाशिक महापालिकेत आजपासून दोन दिवस स्पर्धात्मक पुष्पप्रदर्शन भरवले जाणार आहे. एकूण 577 प्रवेशिका उद्यान आणि वृक्षप्राधिकरण विभागाला प्राप्त झाल्या आहेत.
अहमदनगर
- शिर्डीमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत देशातील सर्वात मोठ्या 'महापशुधन एक्स्पो'चे आयोजन करण्यात आले आहे. 24 ते 26 मार्च दरम्यान संपन्न होणाऱ्या एक्स्पोचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
गोंदिया
- सिंधी समाजाच्यावतीने हेमू कालानी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भंडारा
- महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीनं महिलांच्या सक्षमीकरणावर आणि सबलीकरणावर भर देण्यासाठी भंडारा इथं 24 ते 26 या तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे.