एक्स्प्लोर

23 October In History: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म, जगप्रसिद्ध अॅपल कंपनीचा पहिला आयपोड लाँच; आज इतिहासात

On This Day In History : आजच्याच दिवशी स्टीव्ह जॉब्सन 1976 मध्ये स्थापन केलेल्या अॅपल कंपनीचा तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारा दिवस ठरला. 2001 साली अॅपल कंपनीचा आयपोड हा लाँच करण्यात आला.

मुंबई : कॉम्प्युटर, मोबाईल, आयपॉड यासह अनेक उत्पादने बनवणाऱ्या अॅपलची उत्पादने गुणवत्तेत सर्वोत्तम मानली जातात. अॅपलने 23 ऑक्टोबर 2001 मध्ये iPod बाजारात आणला. छोट्या आयपॉडने हजारो गाणी श्रोत्यांच्या खिशात अगदी आरामात बसवली. त्यावेळी हे जगातील सर्वात यशस्वी आणि क्रांतिकारक उत्पादन मानले गेले.प्रसिद्ध अभिनेता देवेन वर्मा यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. 21 ऑक्टोबर 1943 साली बोस यांच्या झाशीची राणी रेजिमेंटने सिंगापूरमध्ये प्रशिक्षण सुरु केले. ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक पार पडली. तर  ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म झाला होता.  आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

1937 : प्रसिद्ध अभिनेता देवेन वर्मा यांचा जन्मदिवस 

आज प्रसिद्ध कॉमेडियन देवेन वर्मा यांची जयंती आहे. देवेन वर्मा यांनी 42 वर्षे बॉलीवूडमध्ये काम केले आणि नंतर स्वतःला अभिनयापासून दूर केले. देवेन वर्मा यांनी 'दीवार', 'अनुपम', 'चोर के घर चोर', 'बेशरम', 'भोला भला', 'लोक-परलोक' आणि 'गोलमाल' यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलं होत. 70 च्या दशकात देवेन वर्मा हे बॉलिवूडमधील एकमेव कॉमेडियन होते, ज्यांना खूप मागणी होती. देवेन वर्मा यांना तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चोरी मेरा काम' या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कारही मिळाला होता. देवेन वर्मा यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत जवळपास 149 चित्रपटांमध्ये काम केले. देवेन वर्मा यांनी 2 डिसेंबर 2014 रोजी हृदयविकाराचा झटका आणि किडनी निकामी झाल्याने जगाचा कायमचा निरोप घेतला.

1940 :  ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म

आजच्याच दिवशी फुटबॉलचा जादूगार म्हटल्या जाणाऱ्या पेलेचा जन्म झाला होता. म्हणायचे तर पेलेचे नाव जगातील प्रत्येक मुलाला माहीत आहे, पण त्याचे पूर्ण नाव Edson Arantes do Nascimento आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे. ब्राझीलचा हा सर्वोत्तम खेळाडू आपल्या देशासाठी तीन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. पेलेला बीबीसीचा लाईफ टाइम पुरस्कारही मिळाला आहे. 1999 मध्ये पेलेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने "शतकातील फुटबॉल खेळाडू" म्हणून घोषित केले. 

1943 : बोस यांच्या झाशीची राणी रेजिमेंटने सिंगापूरमध्ये प्रशिक्षण सुरु केले

झाशीची राणी रेजिमेंट ही आझाद हिंद फौजेची एक महिला रेजिमेंट होती. लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली निटची स्थापना जुलै 1943 मध्ये दक्षिण-पूर्व आशियातील स्वयंसेवी भारतीय महिलांनी केली. या रेजिमेंटचे नाव झाशी राज्याच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावावर ठेवण्यात आले. रेजिमेंटच्या स्थापनेची घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी 12 जुलै 1943 रोजी केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद फौजेच्या झाशीची राणी रेजिमेंटने 23 ऑक्टोबर 1943 मध्ये सिंगापूरम येथे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

1945 : शफी इनामदार यांचा जन्मदिवस 

शफी इनामदार यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1945 रोजी दापोलीत झाला. शफी इनामदार यांनी 1982 साली 'विजेता' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 1983 मध्ये आलेल्या अर्ध सत्य या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टर हैदर अलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पहिले नाही. चित्रपटांमध्ये प्रतिभा दाखवण्यासोबतच शफी इनामदार यांचा टेलिव्हिजनवर ही दबदबा होता. 'ये जो है जिंदगी' या लोकप्रिय मालिकेत त्यांनी दमदार भूमिका साकारली होती. याशिवाय ते गुलजार यांच्या गालिब या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसले होते. 13 मार्च 1996 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना पाहत असताना शफी इनामदार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

2001 : पहिला आयपॉड लाँच

आजच्याच दिवशी स्टीव्ह जॉब्सन 1976 मध्ये स्थापन केलेल्या अॅपल कंपनीने तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारे उतपादन बाजारात आणले. कॉम्प्युटर, मोबाईल, आयपॉड यासह अनेक उत्पादने बनवणाऱ्या अॅपलची उत्पादने गुणवत्तेत सर्वोत्तम मानली जातात. अॅपलने 23 ऑक्टोबर 2001 मध्ये iPod बाजारात आणला. छोट्या आयपॉडने हजारो गाणी श्रोत्यांच्या खिशात अगदी आरामात बसवली. त्यावेळी हे जगातील सर्वात यशस्वी आणि क्रांतिकारक उत्पादन मानले गेले.

आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना -

1907 : ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
1850 : अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
1944 : दुसरे महायुद्ध सोविएत रेड सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
1973 : संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
1997 : सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्राप्त.

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Embed widget