एक्स्प्लोर

महाराष्ट्रात मोठ्ठा प्रकल्प आला, फडणवीसांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्करची 20 हजार कोटींची गुंतवणूक

Chhatrapati Sambhajinagar :जपानच्या टोयोटा किर्लोस्करनं महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून एकट्या छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

मुंबई: जपानच्या टोयोटा किर्लोस्करनं (Toyota Kirloskar Motor) महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून एकट्या छत्रपती संभाजीनगर (Chhtrapati Sambhajinagar) येथे तब्बल 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. ज्यामधून सुमारे 8 हजार रोजगार निर्मिती होणार असून मराठवाड्याच्या (Marathawada) अर्थकारणाला त्यातून चालना मिळणार आहे. या निमित्याने देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात महाराष्ट्राचा वरचष्मा कायम असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.

ऑरिक सिटीमध्ये 850 एकरमध्ये उभारणार प्रकल्प

हा प्रकल्प ग्रीनफिल्ड असणार आहे. तर महाराष्ट्र गुंतवणुकीचे क्रमांक 1चे राज्य असून सातत्याने एफडीआयमध्ये नंबर 1 क्रमांकावर कायम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते. त्याच अनुषंगाने त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे बोलले जात आहे.  आज प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत ही मोठी गुंतवणूक राज्यात आली आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ⁠ऑरिक सिटीमध्ये 850 एकरमध्ये हा प्रकल्प साकारणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.

भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगातील एक क्रांती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. यासाठी 20 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून सुमारे 8 हजार थेट आणि अप्रत्यक्ष 8 हजार अशी 16  हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला 4 लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच, शिवाय एकूणच राज्य आणि भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे. एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा यांच्या उपस्थित कार्यक्रम आज पार पडलाय.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊतABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 24 January 2025Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
Embed widget