एक्स्प्लोर
MIM च्या नवनिर्वाचित नगरसेवकाला पोलिस कोठडी
सोलापूर : एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निवडणूक प्रचारात विरोधी उमेदवाराच्या घरावर दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल होता. त्याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी काल तौफिक शेख यांना अटक केली होती. आज न्यायालयासमोर उभं केलं असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तौफिक शेख हे एमआयएमचे सोलापूर शहर अध्यक्ष आहेत. सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएमकडून पतंगाच्या चिन्हावर तौफिक शेख निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक केल्याचा गुन्हा तौफिक शेख यांच्यावर दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवसापासूनच तौफिक शेख फरार होते. विजापूर नाका पोलिसांनी अखेर काल त्यांना अटक केली.
वादग्रस्त कारकीर्द
तौफिक शेख यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. मटका, दारु, जुगार अड्डे, खंडणी, मारामारी आणि सामाजिक शांतता भंग केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अशा वादग्रस्त व्यक्तीला एमआयएमच्या असदुद्दिन ओवेसी यांनी पक्षात महत्वाचं स्थान दिलं आहे.
सुशीलकुमार शिंदेंचे कट्टर समर्थक ते एमआयएम नगरसेवक
तौफिक शेख पूर्वी काँग्रेसचे नगरसेवक आणि सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. पण तौफिक शेख यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएमकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. 26 नोव्हेंबरला जागा बळकावण्यासाठी एका तरुणाचं अपहरण केल्याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरावर दगडफेक, सोलापूर एमआयएम शहराध्यक्षाला अटक
सोलापुरात एमआयएमच्या रॅलीवर हल्ला, राष्ट्रवादीवर आरोप
एमआयएमच्या सोलापूर शहराध्यक्षाला अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement