एक्स्प्लोर
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू
मनमाडच्या तळेगांव भामेर गावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. कोमल नामदेव रामदास असं या मुलीचं नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

मनमाड : मनमाडच्या तळेगांव भामेर गावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. कोमल नामदेव रामदास असं या मुलीचं नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.
ही मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत झोपली होती. याचवेळी बिबट्याने हल्ला केला. कोमलच्या रडण्याच्या आवाजाने आई-वडील जागे झाले. मात्र तोपर्यंत बिबट्यानं कोमलला उचलून नेले होतं.
सकाळी शेजारील ऊसाच्या शेतात कोमलचं शीर सापडलं.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागात नरभक्षक बिबट्याचा वावर होता. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे एका चिमुकल्याचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























