एक्स्प्लोर

जितेंद्र आव्हाडांसह 19 आमदार 9 महिन्यांसाठी निलंबित

मुंबई: अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 10 आमदारांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश आहे. या सर्वांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात यावं, असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला. तो मान्य करण्यात आला. त्यामुळे आता या आमदारांना पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनाला हजर राहता येणार नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे  असे आरोप ठेवून या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. हे आमदार निलंबित काँग्रेसचे निलंबित आमदार
  1. अमर काळे - काँग्रेस,  आर्वी मतदारसंघ, वर्धा
  2. विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
  3. हर्षवर्धन सकपाळ - काँग्रेस, बुलडाणा
  4. अब्दुल सत्तार - काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद
  5. डी.पी. सावंत - काँग्रेस, नांदेड उत्तर
  6. संग्राम थोपटे - काँग्रेस, भोर, पुणे
  7. अमित झनक - काँग्रेस, रिसोड, वाशिम
  8. कुणाल पाटील - काँग्रेस, धुळे ग्रामीण
  9. जयकुमार गोरे - काँग्रेस, माण - सातारा
www.abpmajha.in  राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार
  1. भास्कर जाधव - राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी
  2. जितेंद्र आव्हाड - राष्ट्रवादी, कळवा, ठाणे
  3. मधुसूदन केंद्रे - राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी
  4. संग्राम जगताप - राष्ट्रवादी, अहमदनगर
  5. अवधूत तटकरे - राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड
  6. दीपक चव्हाण - राष्ट्रवादी, फलटण - सातारा
  7. नरहरी जिरवाळ - राष्ट्रवादी काँग्रेस  दिंडोरी, नाशिक
  8. वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले - अहमदनगर
  9. राहुल जगताप - राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर
  10. दत्तात्रय भरणे - राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे
संबंधित बातमी

19 आमदारांचं निलंबन : कोण काय म्हणालं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Dindoshi | 'बाण' ते 'खान' दिंडोशींच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर कडाडले!ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 11 November 2024Kishori Pednekar on Amit Thackeray | अमित ठाकरे हे आक्रमक नाही तर उद्धट, पेडणेकरांची टीकाZeeshan Siddique Mumbai : रेकॉर्ड ब्रेक मतांनी यावर्षी मी निवडून येणार आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
VIDEO : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
Embed widget