एक्स्प्लोर

मुलांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद, 12 ते 15 वयोगटातील मुलांनाही लस देण्याची केंद्राकडे मागणी : राजेश टोपे

मुलं खूप उत्साहाने लस घेत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार लसीकरणाचे काम सुरू असल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

जालना : आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जालन्यामधील आरोग्य केंद्रामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थित लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुलं खूप उत्साहाने लस घेत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार लसीकरणाचे काम सुरू आहे. स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. तसेच 12 ते 15 वयोगटातील मुलांना देखील लस देण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांच्याकडे केली असल्याचेही टोपे म्हणाले. दरम्यान, सध्या राज्यात लॉकडाऊनचा विचार नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.

15 ते 18 वयोगटातील लसीकरणामुळे कोरोनोला थांबवण्यासाठी चांगला उपयोग होईल असे ते म्हणाले. या गटातील मुले खूप फिरणारी असतात. त्यामुळे त्यांना लसीकरणाची खूप गरज होती. त्यादृष्टीने लसीकरण सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले. वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बैठक झाली. याबाबत कमी दरात औषधे उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या किट्स उपलब्ध करुन देण्याची मागणीही केल्याचे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, 12 ते 15 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण करावे, अशी विनंती यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केल्याचे टोपे यांनी सांगितले.

सर्व राज्यांना सारखे नियम लागू करावेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. मात्र, सर्व राज्यांना समान नियम लागू करावेत अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. लहान मुलांना शाळेत जाऊनच लसीकरण करावे, अशी आमची योजना होती, मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकाणातून आम्ही लसीकरण केंद्रावरचे लस देण्याचे नियोजन केल्याचे टोपे म्हणाले. 
15 ते 18 वयोगटातील राज्यात जवळपास 70 ते 80 लाख मुले आहेत. त्या सर्वांना लस देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे टोपे म्हणाले. सुरक्षीततेचा विचार करुन लसीकरणाच्या बाबतीत आवश्यक ते बदल केले जातील असे टोपेंनी यावेळी सांगितले. 

नेत्यांनी आयोजकांना सांगावे
अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. अशा कार्यक्रमात कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत, असा प्रश्न टोपे यांना केले असता, त्यांनी सांगितले की, सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. आयोजकांनी नियमांचे पालन करुन कार्यक्रम घ्यावेत. तसेच राजकीय नेत्यांनीसुद्धा त्यांना तसे सांगावे असे टोपे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget