एक्स्प्लोर
पुण्यात महालक्ष्मीला तब्बल 14 किलोंची सोन्याची साडी

पुणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर सारसबागेतील महालक्ष्मीला तब्बल 14 किलो वजनाची सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. तसंच सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात दसऱ्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सारसबागेतील महालक्ष्मीला गेल्या सात वर्षांपासून ही सोन्याची साडी नेसवण्यात येते. दसरा आणि लक्ष्मीपुजेला महालक्ष्मीला सोन्याची साडी नेसवून पुजा बांधली जाते. महालक्ष्मीचं हे रुप डोळ्यात साठवण्यासाठी सारसबागेत भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. 33 वर्ष जुन्या सारसबाग महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीही मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग























