एक्स्प्लोर

राज्यातील 132 पोलीस ठाण्यांमध्ये आता वीज चोरीचे गुन्हे दाखल होणार!

वीज चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं. या संदर्भातील परिपत्रक गृह विभागाने 28 फेब्रुवारी रोजी जारी केलं.

मुंबई : वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गृहविभागाने राज्यातील 132 पोलीस ठाण्यांमध्ये परवानगी दिली आहे. वीज चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं. या संदर्भातील परिपत्रक गृह विभागाने 28 फेब्रुवारी रोजी जारी केलं. या 132 पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचायजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधीत प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. साधारणत: प्रत्येक जिल्हयात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येतील. मोठया शहरांमध्ये 5 पोलीस ठाण्यांना वीज चोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणचे 6 पोलीस ठाणे बंद करण्यात आले, वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे 10 टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात 4, औरंगाबाद 5, बीड 4, ठाणे 10, धुळे 3,  हिंगोलीत 3, नांदेड 4, नाशिक 5, जालन्यात 3, परभणी 3, उस्मानाबाद 3, लातूर 3, नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून 7 अशी पोलीस ठाण्यांची संख्या आहे. पुणे शहर आणि ग्रामीण मिळून 7 पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीची तक्रार दाखल करता येणार आहे. सोलापूर 4, अकोला 3, अमरावती 4, भंडारा 2, बुलडाणा 2, चंद्रपूर 3, गडचिरोली 2, गोंदिया 3, जळगाव 4, कोल्हापूर 2, नंदुरबार 3, पालघर 6, रायगड 4, रत्नागिरी 2, सां‍गली 3, सातारा 3, सिंधुदुर्ग 2, वर्धा 2, वाशिम 3, यवतमाळ 4, मुंबई शहर आणि उपनगरात 7 पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करता येतील. वीज बिल न भरल्यामुळे राज्यातील निवासी 26 लाख 90 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे, तर 2 लाख 35 हजार कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. या निवासी ग्राहकांकडे दंड व्याजाची रक्कम म्हणून 2351 कोटी तर कृषी ग्राहकांकडे 886 कोटी वीज बिलाची थकबाकी आहे. वीज बिल न भरणाऱ्या निवासी, कृषी आणि अन्य ग्राहकांकडे दंड व्याज धरून 7 हजार 274 कोटींची वीज बिलाची थकबाकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

BMC Mumbai: मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Embed widget