एक्स्प्लोर

Udise Plus : विद्यार्थ्यांप्रमाणे राज्यातील 12,653 शिक्षकांचे आधार कार्ड यू डायस प्रणालीमध्ये अवैध, मुंबई-पुण्यात संख्या मोठी

Aadhaar : आधार कार्डच्या अपडेटवरच 2022- 23 ची संच मान्यता ठरणार असून विद्यार्थ्यांच्या संख्येवरूनच राज्यातील शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे.

मुंबई: विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्यातील 12,653 शिक्षकांचे आधार कार्ड  अवैध असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना 30 एप्रिल पर्यंत सर्व शिक्षकांचे आधार कार्ड यू-डायस प्रणालीमध्ये व्हॅलिड (वैध) करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. राज्यभरातील शिक्षक सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड यू डायस प्लस या केंद्र सरकारच्या प्रणालीमध्ये अपडेट करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अजूनही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे अपडेशनचे काम बाकी असल्याची माहिती आहे.

एकीकडे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांचे आधार कार्ड या प्रणालीमध्ये अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील साडे बारा हजाराच्यावर शिक्षकांचे स्वतःचे आधारकार्डच या प्रणालीद्वारे व्हॅलिड नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई, पुण्यात या शिक्षकांची संख्या चौदाशेंच्यावर आहे.

या आधार कार्डच्या अपडेटवरच 2022- 23 ची संच मान्यता ठरणार असून विद्यार्थ्यांच्या संख्येवरूनच राज्यातील शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे आधार कार्ड व्हॅलिडेट करणे आणि माहिती भरणे सक्तीचे आहे.अन्यथा राज्यातील शिक्षकांच्या यादीमध्ये अशा शिक्षकांना वैध ठरवले जाणार नाही.

पुण्यामध्ये 1402 शिक्षक, मुंबईतील बीएसमी शाळेतील मिळून 1455 शिक्षक, ठाण्यात 1322, सोलापूर 617 नाशिक 598,नागपूर 827, पालघर 565, संभाजीनगर 587 शिक्षक असे राज्यभरातील 12653 शिक्षक या यादीमध्ये समोर आले आहेत.

विदर्भात जवळपास दोन हजार शिक्षकांचे आधार अपडेट नाही

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची संचमान्यता मिळविण्यासाठी त्यांचं आधार कार्ड यू-डायस या सॉफ्टवेयर सोबत लिंक करणे सरकारने अनिवार्य केलं आहे. मात्र ही जबाबदारी ज्या शिक्षकांवर आहे त्या शिक्षकांचेच आधार कार्ड या सॉफ्टवेयर मध्ये अपडेट नसल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भातील तब्बल 1 हजार 889 शिक्षकांचे आधार कार्ड अपडेट नसून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 247 शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांना 30 एप्रिलपर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांचे आधार कार्ड का अपडेट नाही याबाबत प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही.

Beed Teachers : ... तर शिक्षकांचे आधार कार्ड बोगस असल्याचं जाहीर करणार, शिक्षण आयुक्तांचा आदेश

बीड जिल्ह्यातील 165 शिक्षकांच्या आधार कार्ड लिंक होत नसल्याने त्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे आणि त्यानंतरही आधार कार्ड लिंक न झाल्यास या शिक्षकांचे आधार कार्ड बोगस घोषित करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यातच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे आधार लिंक करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील 165 शिक्षकांचे आधार शाळेच्या वेबसाईटवर लिंक होत नसल्यामुळे हे आधारे कार्ड 30 एप्रिल पर्यंत लिंक करणे बंधनकारक करण्यात आल आहे. ते न झाल्यास या शिक्षकांचे आधार कार्ड बोगस घोषित करण्यात येणार असल्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget