एक्स्प्लोर
Advertisement
दहावीत 96 टक्के घेणाऱ्या मुलीची आत्महत्या नेमकी कशामुळे?
मयत सायलीच्या आई-वडिलांनी खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केलाय. या आरोपाला पुष्टी देणारे काही पुरावे तिच्या वह्यांमध्ये सापडू लागले आहेत.
जालना : अकरावीत शिकणाऱ्या जालन्यातील विद्यार्थीनीने आठ दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली. अतिशय हुशार, हसतमुख आणि संवेदनशील मुलीने ही आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, मयत सायलीच्या आई-वडिलांनी खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केलाय. या आरोपाला पुष्टी देणारे काही पुरावे तिच्या वह्यांमध्ये सापडू लागले आहेत.
जालना शहरातील गायत्री नगरात 6 जुलै रोजी अकरावीत शिकणाऱ्या सायली जोशी या 17 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नेहमीच सर्वांशी गोड बोलणारी हसमुख सायलीने हे पाऊल का उचललं? हा प्रश्न सर्वांनाच पडला. सायलीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वडिलांना उद्देशून चिठ्ठी लिहिली, ज्यात तिने आपल्याला ट्युशनमध्ये कमी मार्क्स पडले म्हणून आपण हे पाऊल उचलत असल्याचं लिहिलं.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर
"Dear Baba I am sorry.. तुम्ही प्रत्येक वेळेस मला adjust करतात, आणि मी प्रत्येक वेळेस कमी पडते, बाबा मला या Test ला पण कमी मार्क्स आले 79 असे. आता मला लाज वाटायली, नाही बाबा, मी तुम्हाला आणखीन त्रास नाही देऊ शकत, am really sorry. पण आता मलाच माझी लाज वाटायली म्हणून........तुमची लाडकी - सायली
सायलीच्या याच चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी आत्महत्येनंतर आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस दप्तरी नोंद करुन कारवाईच सोपस्कार पार पाडला. मात्र सायलीच्या या आत्महत्येमागे तिचे खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केलाय. शहरात खाजगी शिकवणी घेणारे KCC कोचिंग क्लासेसचे संचालक अंकुश सोनवणे यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
सायलीच्या आई-वडिलांच्या या आरोपाला पुरावा म्हणजे सायलीच्या रुममध्ये सापडत असलेल्या एक एक डायऱ्या.. ज्यात तिने आपला सातत्याने शिक्षक अंकुश सोनवणे आणि त्यांच्या सह-शिक्षकाकडून अपमान होत असल्याचा उल्लेख केलाय. शिक्षक अंकुश सोनवणे हे वर्गात वारंवार अपमानास्पद बोलून माझ्या शैक्षणिक पात्रतेवर शंका घेत असल्याचं देखील सायलीने डायरीमध्ये नमूद केलंय. शिक्षक सोनवणे यांनी south indian सिनेमातल्या over acting करणाऱ्या पात्रासारखी तू कंटाळवाणी वाटत असल्याचं म्हंटलेलं वाक्य देखील तिने डायरीमध्ये नमूद केलं होतं.
सायलीच्या याच वेदना तिने अस्पष्ट अशा पांढऱ्या खडूने घरातल्या भिंतीवर देखील लिहिल्या आहेत. शिक्षकाकडून वर्गांमध्ये सातत्याने होणारी अभ्यासाविषयीची व्यक्तीगत टीका सायलीच्या संवेदनशील मनाला रुचली नाही, हे तिच्या लिहिण्यातून स्पष्ट होतं.
पोलीस सरकारी वकिलाचा अभिप्राय मागवणार
सायलीच्या मृत्यूला आठ दिवस उलटून गेले आहेत. मात्र पोलीस तपास फक्त मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठी भोवतीच अडकलाय. दरम्यान, तिने लिहिलेल्या डायरीविषयी आम्ही विचारणा केली असता सरकारी वकिलाचा अभिप्राय मागवून त्या नंतरच योग्य कारवाई होईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
एवढ्या गंभीर आरोपानंतर KCC कोचिंग क्लासेसच्या अंकुश सोनवणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
लहानपणापासून हुशार असलेल्या सायलीला दहावीत 96 टक्के गुण मिळाले होते. अनेक वक्तृत्व स्पर्धा आणि स्थानिक कार्यक्रमात तिला मोठे बक्षीस आणि प्रशस्ती पत्र देखील मिळाले होते. मात्र असं असताना तिने उचललेले टोकाचे पाऊल दुर्दैवी तर आहेच, मात्र या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उभं करणार देखील आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement