एक्स्प्लोर

अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा देण्याचा शासनाचा निर्णय, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची घोषणा

राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणं अवघड झालं होतं. राज्य मंडळाने दहावीचे अंतर्गत गुण बंद केल्याने निकाल यंदा कमी लागला आहे.

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा देणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.  11 वी प्रवेश आणि जागांवरुन बराच घोळ सुरु होता. यावर आज शेलार यांनी विधानसभेत निवेदन केले. सर्वांना समान न्याय व प्रवेशासाठी समान संधी या तत्वावर अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबईपुणेनागपूर या शहरातील ऑनलाईन प्रवेशाकरिता निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयामध्ये जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांचा भाग दोन भरून घेणे व पुढील प्रक्रिया उद्या  19 जूनपासून सुरू करण्यात येत आहेअशी माहिती  शेलार यांनी  विधानसभेत  दिली.  शेलार म्हणालेमुंबई क्षेत्रातील निवडक प्राचार्यांसोबत झालेल्या चर्चेप्रमाणे मुंबईकरिता निश्चित ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेकरिता 5 टक्के आणि कला व वाणिज्य शाखेकरिता 8 टक्के अधिक जागा वाढवून देण्यात येत आहे. तसेच पुणे व नागपूर करिता निश्चित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये कलावाणिज्य व विज्ञान या शाखेकरिता 10 टक्के जागा विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वाढवून देण्यात येत आहेत. ही वाढ या क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाकरिता नोंदणी केलेले राज्यमंडळ आणि सीबीएसई (CBSE) व आसीएसई (ICSE) च्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालया व्यतिरिक्त अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही जागा वाढवून देण्यास मंजुरी देण्यात येत आहे. या महाविद्यालयांच्या मागणीनुसार व त्यांची गरज तपासून वाढीव जागा विभागिय शिक्षण उपसंचालक स्तरावर मंजूर करण्यात येतील. जुलै 2019 मध्ये पुरवणी परीक्षा व यानंतर इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सदर वाढीव जागेची टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यात येईल. सन 2019-20 या वर्षाकरिताच इयत्ता अकरावी करिता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या वाढीव जागा मंजूर करण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राज्य मंडळाची संलग्नित असलेल्या शाळांतील इयत्ता  दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन व्हावेया हेतूने भाषा व समाजशास्त्र या विषयातील अंतर्गत मुल्यमापन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्यातील इयत्ता दहावीच्या निकालात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. मार्च 2019 मध्ये इयत्ता दहावीच्या राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेकरिता 16 लाख 77 हजार 267 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. व त्यापैकी 12 लाख 66 हजार 861 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 75.53 टक्के इतकी आहेअसेही शेलार यांनी सांगितले. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget