एक्स्प्लोर

अकरा नगरसेवकांच्या अपात्रते प्रकरणी भाजप तोंडघशी

11 अपात्र नगरसेवकांना निवडणुकीच्या मतदानापासून रोखता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यामुळे भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली.

बीड : एकीकडे कर्नाटकमध्ये भाजप सरकारची नाचक्की झाली असतानाच महाराष्ट्रातही एका छोट्याशा निर्णयामुळे भाजप सरकार तोंडघशी पडलं आहे. 11 अपात्र नगरसेवकांना निवडणुकीच्या मतदानापासून रोखता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यामुळे भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली. बीड शहरातील स्वच्छतेवरुन काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या कक्षात आणि टेबल-खुर्चीवर कचरा टाकून पदाचा अवमान केला होता. या प्रकरणी काकू-नाना आघाडीच्या 11 नगरसेवकांना अपात्र करण्यात आलं. त्यामुळे या नगरसेवकांना आता नगर परिषदेच्या काऊन्सिलमध्येही बसता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपात्र नगरसेवकांना मतदानाचा हक्क बजावता येऊ नये, अशी मागणी भाजप उमेदवार सुरेश धस यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र निवडणूक आयोगाने अपात्र नगरसेवकांना निवडणुकीच्या मतदानापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिला. त्यामुळे आपल्या विरोधातील मतदान रोखण्यासाठी भाजपने ऐनवेळी जी खेळी केली, ती  सपशेल फोल ठरल्याचे या निर्णयातून पाहायला मिळते. आठ महिन्यांपूर्वी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कक्षामध्ये कचरा टाकला होता. त्यामुळे नगराध्यक्षांच्या गटाने याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शनिवारी नगर विकास राज्यमंत्र्यांनी निर्णय दिला आहे. नगरसेवक पद रद्द झाले असले तरी या नगरसेवकांना विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे. यामध्ये उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, नगरसेवक प्रभाकर पोपळे, सय्यद फारुक अली नुसरत अली, युवराज जगताप, रमेश चव्हाण, अमर नाईकवाडे, सम्राटसिंह चव्हाण, हाश्मी इद्रीस अहमद, मोमीन अजहरोद्दीन मोमीन नैमुद्दीन, रणजीत बनसोडे या नगरसेवकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget