(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IAS Officers Transfers: राज्य सरकारकडून आणखी 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
IAS Officers Transfers: राजेश कुमार, राजगोपाल देवरा, डॉ. जगदीश पाटील, विजय सिंघल, डॉ. हर्षदीप कांबळे यांसारख्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारकडून बदल्या करण्यात आल्या आहेत.
IAS Officers Transfers: महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officers Transfers) केल्या आहेत. यापूर्वीही राज्य सरकारनं काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता पुन्हा आणखी 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजेश कुमार, राजगोपाल देवरा, डॉ. जगदीश पाटील, विजय सिंघल, डॉ. हर्षदीप कांबळे यांसारख्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
1988 बॅचचे IAS अधिकारी राजेश कुमार यांची ग्रामीण विकास विभागात पुनर्वसन आणि पुनर्वसनासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी अनुप कुमार यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात कृषीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे प्रधान सचिव असलेल्या 1992 च्या बॅचचे IAS अधिकारी राजगोपाल देवरा यांच्याकडे राजशिष्टाचार विभागाचं प्रधान सचिवपद सोपवण्यात आलं आहे. तर, उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त विजय सिंघल यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आलं आहे.
अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदी कार्यरत असलेले डॉ. हर्षदीप कांबळे यांना उद्योग संचालनालयाच्या विकास आयुक्तपदी पाठवण्यात आलं आहे. तर, कृषी सचिव असलेल्या ए. एल. जऱ्हाड यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आलं आहे. इतर उल्लेखनीय पदांवर असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव (शहरी विकास), राधिका रस्तोगी प्रधान सचिव (पर्यटन) आणि संजय खंदारे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुक्त, सहकार आणि नोंदणी, को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचे आयुक्त असलेले जगदीश पाटील यांच्याकडे कोकण विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून विकास देशमुख यांच्याकडे कृषी सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेल्या संजय देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
- राजगोपाल देवरा (Rajagopal Devara), IAS (1992) : राजशिष्टाचार विभागाचं प्रधान सचिवपद (महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव)
- राजेश कुमार (Rajesh Kumar), IAS (1988) : अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग - मदत आणि पुनर्वसन विभाग
- अनुप कुमार (Anoop Kumar), IAS (1990) : अपर मुख्य सचिव, सहकार आणि पणन विभाग-कृषी विभाग
- राधिका रस्तोगी (Radhika Rastogi), IAS (1995) : प्रधान सचिव, पर्यटन विभाग
- संजय खंदारे (Sanjay Khandare), IAS (1996) : प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
- एकनाथ डवले (Eknath Dawale), IAS (1997) : प्रधान सचिव कृषी विभाग - ग्रामविकास विभाग
- सौरभ व्यास (Saurabh Vijay), IAS (1998) : प्रधान सचिव, पर्यटन विभाग विकास आयुक्त, नियोजन विभाग
- आर.एस.जगताप (R.S.Jagtap), IAS (2008) : उप महा, यशादा पुणे
- जितेंद्र दुडी (Jitendra Dudi), IAS (2016) : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली - जिल्हाधिकारी सातारा