एक्स्प्लोर

शोधायला गेले गांजा, सापडलं मोठं घबाड; ओडिशात महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्याकडून 1.22 कोटींची रक्कम, 20 सोन्याची बिस्किटं जप्त

बेहरामपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून हा तपास आता आयकर विभागाकडून करण्यात येणार आहे. यामागचे सांगली कनेक्शन काय याचा तपास करण्यात येणार आहे.

बेहरामपूर : ओडिशामध्ये महाराष्ट्रातल्या एका व्यावसायिकाकडे मोठं घबाड सापडलं आहे. त्याच्याकडे 1 कोटी 21 लाख 97 हजारांची रोकड सापडली असून सोबत 20 सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली आहेत. गांजा तस्करीप्रकरणी बसमध्ये तपास करत असताना ही रक्कम पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.

बसमधून गांजा तस्करी केली जात असल्याची माहिती ओडिशातील बेहरामपूर पोलिसांना लागली होती. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करुन तपास सुरू केला. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दशरथ सावकार नावाच्या एका व्यापाराला ताब्यात घेतलं आहे. हा व्यापारी सांगली जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जातंय. 

बेहरामपूरच्या आनंद ज्वेलर्स या दुकानात हे सोनं देण्यासाठी तो व्यापारी येत होता. त्यावेळी बेहरामपूर पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त केला. या व्यापाराकडे सापडलेल्या रोख रक्कमेतील सर्व नोटा या 500 रुपयांच्या आहेत. बेहरामपूर पोलिसांनी या कारवाईची माहिती आयकर विभागाला दिली असून या पुढचा तपास हा आयकर विभाग करणार आहे. 

या व्यापाऱ्याकडे सापडलेली रक्कम ही हवालासाठी वापरण्यात येत होती का याचा तपास आता आयकर विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच या व्यापाऱ्याकडे सापडलेल्या सोन्याच्या 20 बिस्किटांचे वजन हे जवळपास अडीच किलो इतकं होतंय. हे सोनं त्याने स्मगलिंगच्या माध्यमातून मिळवलं आहे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच या व्यापाऱ्याचे सांगली कनेक्शन काय आहे याचा तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणालाWest Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
Embed widget