एक्स्प्लोर

आज विधानसभा अध्यक्षपदासाठी परीक्षा, महाविकास आघाडीची नवी रणनीती

पहिली परीक्षा पास झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या परीक्षेचा सामना करावा लागणार आहे. अर्थातच काल 169 मतांनी बहुमत सिद्ध केल्याने विधानसभा अध्यक्षपदाचा 'सामना' देखील महाविकास आघाडीच जिंकणार अशी दाट शक्यता आहे. निवडणुकीसाठी आज सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडी नवी खेळी करण्याच्या तयारीत आहे.

मुंबई : महाविकास आघाडीला काल बहुमत सिद्ध करुन पहिली परीक्षा पास झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या परीक्षेचा सामना करावा लागणार आहे. अर्थातच काल 169 मतांनी बहुमत सिद्ध केल्याने विधानसभा अध्यक्षपदाचा 'सामना' देखील महाविकास आघाडीच जिंकणार अशी दाट शक्यता आहे. निवडणुकीसाठी आज सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडी नवी खेळी करण्याच्या तयारीत आहे. गुप्त मतदानाने होणारी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची महाविकास आघाडीची रणनीती असल्याची माहिती मिळत आहे. तसा प्रस्ताव आधी विधानसभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. तो प्रस्ताव मंजूर करुन, मग अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांकडून सुरु असल्याचं समोर येत आहे. बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीनं घेतली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे तर भाजपकडून किसन कथोरे हे उमेदवार आहेत. काल बहुमत पास झाल्यानंतर आजच्या अध्यक्ष निवडीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज घेण्याची वेळ आज सकाळी 10 वाजेपर्यंत आहे. भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास निवडणूक होणार नाही. पण जर निवडणूक झाली तर ती खुल्या पद्धतीने व्हावी, यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे. असा आहे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम : * विधानसभा अध्यक्षांची निवड 1 डिसेंबरला सकाळी 11 वाजता * विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत * नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत * नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत 1 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत विरोधी पक्षनेत्याच्या घोषणेबाबत संभ्रम विरोधी पक्षनेत्याची घोषणा आज होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. कारण, विधानसभेतील आजच्या कामकाचं स्वरुप पाहिल्यास अध्यक्षांनी तालिका नामनिर्देशित करणे, त्यानंतर अध्यक्षांची निवडणूक आणि राज्यपालांचं अभिभाषण असा क्रम देण्यात आलाय. त्यात विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत घोषणेचा उल्लेख नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याची घोषणा आज होणार की नाही, हा प्रश्न कायम आहे. महाविकास आघाडी बहुमत चाचणीत पास दरम्यान, काल उद्धव ठाकरे सरकारनं बहुमत चाचणी 169 विरुद्ध शून्य अशा फरकानं सिद्ध केलं. विश्वासदर्शक ठरावापूर्वी भाजप आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी मनसेचा 1, एमआयएमचे 2 आणि माकपचा एक सदस्य तटस्थ राहिले. भाजपनं मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या शपथविधी आणि अधिवेशनही बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. मात्र, हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचा आक्षेप फेटाळून लावला. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...
पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Embed widget