एक्स्प्लोर

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक ट्रेन रद्द, लोकल सेवेवरवही परिणाम

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला असून कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत.

मुंबई : मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे.

मुंबईतील दादर, परळ परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोबतच दक्षिण मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पुढील काही तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आयएमडी मुंबईने काल रात्री साडे बारा वाजता जाहीर केलं होतं.  

रेल्वे सेवेवरही पावसामुळे परिणाम झाला असून सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या लोकल ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून  येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवरही होत आहे. येत्या दिवसभरात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबई उपनगरातील काही भागात पावसाच्या पाण्यामुळे टू व्हिलर गाड्या वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी आल्याने आज दिवसभर लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अंधेरीच्या अनेक भागात पाणी साचलं आहे तर कांदीवलीमधील काही भागातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.

मिठी नदी धोक्याच्या पातळीच्या खूप वर गेली 3.3 मीटर अशी धोक्याची पातळी आहे. मात्र आता मिठी नदीचे पाणी 4.2 झाले आहे, म्हणजे ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे पालिकेने आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यास सुरुवात केली आहे. कुर्ला येथील क्रांती नगर खाली केले जात आहे. सर्व कुटुंबाना पालिकेच्या शाळांमध्ये नेले जात आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Football : कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
"स्वतःच्या आया, बहिणींचे व्हिडीओ जाऊन बघा, त्यांचंही शरीर माझ्यासारखंच..." 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचा संताप
Eid Ul Fitr 2025: ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
Sikandar Box Office Collection Day 1: 'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 31 March 2025Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 31 March 2025ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 31 March 2025100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 31 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Football : कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
"स्वतःच्या आया, बहिणींचे व्हिडीओ जाऊन बघा, त्यांचंही शरीर माझ्यासारखंच..." 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचा संताप
Eid Ul Fitr 2025: ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
Sikandar Box Office Collection Day 1: 'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
Maharashtra LIVE: कोल्हापुरात फुटबॉलच्या सामन्यात मैदानात फ्री-स्टाईल हाणामारी
Maharashtra LIVE: कोल्हापुरात फुटबॉलच्या सामन्यात मैदानात फ्री-स्टाईल हाणामारी
Beed Crime: संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच झाडाखाली बबलुला संपवलं अन् पोलिसांसमोर हजर झाले
संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच झाडाखाली बबलुला संपवलं अन् पोलिसांसमोर हजर झाले
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Embed widget