Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दहा दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला नेपाळ बॉर्डरवर बेड्या ठोकल्या. राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. आंबा, संत्रा, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त, हातातोंडाशी आलेली पीकं जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांनी टाहो फोडला. दरम्यान, या बातम्यांसह देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
वैष्णवीच्या बाळाचा ताबा आज्जी स्वाती कस्पटेंकडे देण्याचा निर्णय
पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.
यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल.
गोंदिया जिल्ह्यात देखील 2 कोरोना बाधित रुग्ण
गोंदिया फ्लॅश
देशात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे... अशातच गोंदिया जिल्ह्यात देखील 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.. मात्र, या दोन्ही रुग्णांचे लक्षण अगदी सौम्य असून नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक त्या काळजी घेण्याच्या आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे... या दोन रुग्णांपैकी एका रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची तपासणी केली असता ती पॉझिटिव आली असून एक रुग्ण नागपूर येथे तपासणी केली असता पॉझिटिव्ह आले आहे.. साधारणतः दोन्ही रुग्णांची वय 60 च्या वर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे... तर या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे यांना विचारले असता दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती खरी आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे...























