Ajit Pawar in Vidarbha Live : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विदर्भ दौऱ्यातील लाईव्ह अपडेट्स
अजित पवार यांनी आता राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. त्याअंतर्गत बुधवारी रात्री त्यांचे नागपूर येथे आगमन झाले.
LIVE
Background
Vidarbha : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. अजित पवार यांचा चार दिवसांचा दौरा बुधवारपासून सुरु झाला असून बुधवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. गुरुवारी ते गडचिरोली आणि चंद्रपूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. अजित पवार पुढील चार दिवसात आठ जिल्ह्यामंध्ये जाऊन पाहणी करणार आहेत.
yavatmal : येथील शेतकऱ्यांशी पवार यांचा संवाद
यवतमाळः येथील दौऱ्यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. पवार नुकसान झालेल्या गावांची पाहणी करत आहेत.
Wardha : एनजीओ, सीएसआर फंडातून बाधितांची मदत कराः पवार
वर्धाः अतिवृष्टीग्रस्तांची मदत करण्यासाठी सगळंच सरकारने करावं असं नाही आहे. विविध सामाजित संस्थांनी पुढाकार घ्यावा. कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून गरजूंना मदत करावी. वेळ पडल्यास खनिज निधी आणि डीपीसीचाही वापर करुन मदत करता येईल.
दरेकरांनी राजकारण करु नये, मी फालतू गोष्टींना महत्त्व देत नाहीः पवार
वर्धाः प्रवीण दरेकरांनी यात राजकारण करू नये, मला ही तसच उत्तर देता येत, मी अशा फालतू गोष्टींना महत्त्व देत नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Wardha : एसडीआरएमचे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करा
वर्धाः हिंगणघाट शहराच्या पूरग्रस्त भागाची स्वच्छता होणे गरजेचे. एसडीआरएमचे नियम बाजूला ठेवून पूरग्रस्तांना मदत करा.
Wardha : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचे अंत पाहू नकाः अजित पवार
वर्धाः अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी आतापर्यंत शासनाचे सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. आवश्यक असल्यास अधिक मनुष्यबळ वापरावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिला.