Latur : लातूरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी, 27 लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे फरार
Latur News : शिरूर अनंतपाळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी केली होती. साडेदहा वाजता बँक उघडल्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांना चोरी झाल्याचे लक्षात आलं. याबाबत त्यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
लातूर : लातूर (Latur News) जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर ( Maharashtra Gramin Bank) सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा टाकून 27 लाख रुपयांची रोकड पळवल्याची घटना घडली. पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आज मध्यरात्री चोरट्यांनी शिरूर अनंतपाळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी केली. साडेदहा वाजता बँक उघडल्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांना चोरी झाल्याचे लक्षात आलं. याबाबत त्यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार दिली. पोलिसांचे पथक तिथे दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शिरूर अनंतपाळ येथील नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यात 27 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवल्याची माहिती शाखेचे व्यवस्थापक सौरभ वाल्मीक खैरे यांनी दिली.
शिरूर अनंतपाळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून शिरूर अनंतपाळसह तालुक्यातील 14 गावातील लोकांचा व्यवहार या बँकेसोबत चालतो. नेहमीप्रमाणे शाखा व्यवस्थापक बँक उघडण्यासाठी सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आले असता त्यांना बँकेचे मुख्य दरवाजाचे लॉक तोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लातूर येथील रीजनल ऑफिसशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. बँकेत प्रवेश केल्यानंतर मेन लॉकर तोडून त्यामधील 27 लाख रुपयांची कॅश पळवून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली असता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत लातूर येथील श्वानपथकाला बोलावले आणि या दरोड्याचा पंचनामा केला.पोलीस पुढील तपास करत आहेत