Sonu Sood : लातूरच्या वृद्ध जोडप्याचा शेत नांगरतानाचा व्हिडीओ व्हायरल; सोनू सूदचा मदतीचा हात; म्हणाला, "आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।"
Sonu Sood : एक 75 वर्षीय वृद्ध शेतकरी स्वतः नांगर ओढत असून, त्यांच्या पत्नी मागून तो नांगर हाताळताना दिसत आहेत.

लातूर : महाराष्ट्रातील लातूरमधून एक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये 75 वर्षांचा एक व्यक्ती आणि त्याची पत्नी स्वतः शेत नांगरताना दिसत आहेत. तो व्यक्ती नांगर ओढतो आणि त्याची पत्नी तो मागून चालवते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने त्यांच्या मदतीची घोषणा केली आणि स्थानिक प्रशासनही सक्रिय झाले. कृषी विभागाने सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची आणि ओळखपत्रे बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
समोर आलेला हा भावनिक व्हिडीओ लातूरमधील असल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक 75 वर्षीय वृद्ध शेतकरी स्वतः नांगर ओढत असून, त्यांच्या पत्नी मागून तो नांगर हाताळताना दिसत आहेत. त्यांच्याकडे शेतीसाठी बैल किंवा अन्य कोणतेही यंत्र उपलब्ध नसल्याने, त्यांनी स्वतःच शेताची नांगरणी करण्याचा निर्णय घेतला. या दृष्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, शेतीची कामे करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे वृद्ध जोडपं स्वतःच्या श्रमावर शेत नांगरत होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूद यांनी पुढाकार घेत "त्यांचा नंबर द्या, मी बैलांची व्यवस्था करतो" अशी पोस्ट सोशल मिडीया एक्सवरती केली आहे..
#WATCH | Maharashtra | An elderly farmer tills dry land by tying himself to traditional plough in drought-hit area in Latur pic.twitter.com/9geMReVGB0
— ANI (@ANI) July 2, 2025
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनही सक्रिय झाले. लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांच्या शेतावर भेट दिली. त्यांच्याकडे कोरडवाहू जमीन असून, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नाही, हे निदर्शनास आलं. कृषी विभागाकडून त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.अंबादास पवार यांच्याकडे कृषी ओळखपत्र नसल्याने त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांना 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान आणि शेतीसाठी आवश्यक साधनं मिळणार आहेत, अशी माहिती देखील कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी दिली आहे.
आप नंबर भेजिए।
— sonu sood (@SonuSood) July 2, 2025
हम बैल भेजतें हैं। https://t.co/EnaNTQqiZ1
नेमकं प्रकरण काय?
शेतीसाठी साधनसंपत्ती नसल्याने 75 वर्षीय अंबादास पवार हे आपल्या पत्नीसमवेत स्वतःला औताला जुंपून शेती करत असल्याची वेदनादायक कहाणी समोर आली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावचे रहिवासी असलेले हे वृद्ध दाम्पत्य सध्या अत्यंत गंभीर आर्थिक संकटात सापडले आहे.अंबादास पवार यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. मात्र, खते, बियाणं, ट्रॅक्टर किंवा बैल घेण्याची आर्थिक ताकद त्यांच्याकडे नाही. परिणामी, शेती सुरू ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःच औत ओढण्याचा मार्ग स्वीकारला आहे, तर त्यांच्या पत्नीने मागून नांगराची दिशा सांभाळण्याची जबाबदारी घेतली. पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आणि वाढते शेतीखर्च यामुळे त्यांची स्थिती आणखी बिकट झाली आहे. पवार दांपत्याला ना कोणते अनुदान मिळाले, ना यंत्रसामग्री; त्यामुळे शेती करून उपजीविका चालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःच श्रम करणे. सध्या या वृद्ध दाम्पत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक नागरिक आणि संस्था मदतीसाठी पुढे येत असून, अभिनेता सोनू सूद यांनी देखील बैल पुरवण्याची घोषणा केली आहे.
#WATCH | Taluka Agriculture Officer Sachin Bavge says, "Ambadas Pawar has 4 bighas of land, which is dependent on rain for irrigation... Our team of officers visited and found that he lacked the necessary equipment. So, we told him about all the equipment available at subsidized… https://t.co/Ipi3k80XdM pic.twitter.com/xnlz3v1SLm
— ANI (@ANI) July 2, 2025
























