एक्स्प्लोर

जात प्रमाणपत्राची कागदपत्रं जमा करा, हायकोर्टाच्या सूचना; काँग्रेस खासदाराच्या अडचणीत वाढ

Shivaji Kalge Caste Certificate : जात वैधता प्रमाणपत्रासाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांची 2 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्तता करा अशा सूचना हायकोर्टाने लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना दिल्या आहेत. 

लातूर : लोकसभेचे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जात वैधता प्रमाणपत्र याचिकेरवरून नोटीस बजावण्यात आली आहे. डॉ. शिवाजी काळगे यांनी त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या कागदपत्रांची पूर्तता करावी अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. 

डॉ. शिवाजी काळगे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात दोन याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. त्यापैकी नरसिंगराव उदगीरकर यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने डॉ.शिवाजी काळगे यांना नोटीस बजावली आहे. येत्या 2 सप्टेंबर 2024 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्रासाठी देण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी अशी नोटीस बजावली आहे.

शिवाजी काळगे यांनी 1986 साली जात प्रमाणपत्र काढलं होतं, ते औरंगाबादच्या आयुक्तांनी रद्द केल्याची माहिती आहे. तसेच शिवाजी काळगे यांना जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनानेही त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती याचिकाकर्ते उदगीरकर यांनी दिली. 

डॉ. शिवाजी काळगे मोठ्या मताधिक्याने निवडून आले

लातूर लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. भाजपाने दोन वेळेस इथे प्रचंड मताधिकाने विजय मिळवला होता. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच हादरा बसला.  यावेळेस हॅट्रिक करण्यासाठी भाजपाने सर्व प्रयत्न केले. मात्र मतदारांनी कौल डॉ. शिवाजी काळगे यांच्या बाजूने दिला. 

डॉ. शिवाजीराव काळगे (Shivajirao Kalge) यांना 6 लाख 9 हजार 21 मते मिळाली होती. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुधाकर शृंगारे यांना 5 लाख 47 हजार 140 मते पडली. डॉ. शिवाजी काळगे यांनी 61,881 मताची भरघोस आघाडी मिळवून विजय मिळवला. 

अनुसूचित जातीसाठी लातूर मतदारसंघ राखीव आहे. यावेळेस काँग्रेसने लिंगायत समाजातून येणाऱ्या डॉ. शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. पण आता त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्याविरोधात दोन याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget