एक्स्प्लोर

अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू

परभणीच्या मानवत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 61 वर यशवाडी शिवारात एसटी बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला.

परभणी : मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या (Accident) घटना घडल्या आहेत. परभणी (Parbhani) आणि लातूर (Latur) जिल्ह्यातील या अपघाताच्या घटनेत एकूण तीन ठार झाले असून एक बेपत्ता असल्याची माहिती आहे. जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील यशवाडी शिवारात एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मानवतमधील अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली असतानाच, लातूरमध्ये अघातात एकजण ठार झाल्याचे समोर आलं आहे. येथे कारने दुचाकीवरील दोघांना उडवल्याने एक ठार तर एक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. अहमदपूर-अंबाजोगाई रोडवरील ह्या विचित्र अपघातानंतर बेपत्ता व्यक्तीचा लोकांकडून शोध घेतला जात आहे. 

परभणीच्या मानवत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 61 वर यशवाडी शिवारात एसटी बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्य हे जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथील रहिवासी होते. ते यशवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून परत जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.मृतांची ओळख पटविण्याचे व पुढील कार्यवाहीचे काम सुरू आहे. 

लातूरमध्येही अपघात, 1 ठार 1 बेपत्ता

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या काजळ हिप्परगा गावाजवळ आज भीषण अपघात झाला. अहमदपूरकडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या ब्रेझा कारने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. कार चालकाने आपली बाजू सोडून राँग साईडने जात मोटरसायकलला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल चालक तब्बल 50 ते 60 फूट दूर फेकली गेला असून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर, मोटरसायकलवर मागे बसलेली व्यक्ती अपघातानंतर बेपत्ता झाल्याचे सांगितले जात असून तिचा शोध सुरू आहे. त्यासाठी त्या भागातील अनेक लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा लांबपर्यंत जात बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू केला मात्र अद्याप बेपत्ता व्यक्तीचा शोध लागला नाही. ब्रेझा कार चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतरही बराच वेळ पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिकांनीच मृत व्यक्ती आणि जखमीला सरकारी रुग्णालयात हलवले. उशिराने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट

महत्त्वाच्या बातम्या

Abhimanyu Pawar : 15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Embed widget