एक्स्प्लोर

Maharashtra News: 'शाळा माझी न्यारी'... लातूर जिल्हा परिषद शाळेतील हजारो विद्यार्थी स्मार्ट करण्याचा न्यारा उपक्रम

शाळा स्मार्ट झाल्या तर नक्कीच उज्ज्वल भवितव्य असणारी पिढी तयार होईल हाच विचार घेऊन क्रिएटिव्ह फाउंडेशन यांनी राजमाता जिजाऊ 'शाळा माझी न्यारी'  हा उपक्रम राबवला.

Maharashtra News: 70 टक्के महाराष्ट्र हा ग्रामीण भागात वसलेला आहे. जिल्हा परिषदेची शाळा (Zilla Parishad School) या भागातील शिक्षणाचा कणा आहे. मात्र येथील शिक्षणाबाबत कायमच ओरड दिसून येत असते. जर येथील शाळा स्मार्ट (Smart School) झाल्या तर नक्कीच उज्ज्वल भवितव्य असणारी पिढी तयार होईल हाच विचार घेऊन क्रिएटिव्ह फाउंडेशन यांनी राजमाता जिजाऊ 'शाळा माझी न्यारी' (Shala Majhi Nyari)  हा उपक्रम राबवला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देत पारंपारिक खेळ स्मार्ट क्लासरूम आणि ऑनलाईन शिक्षण यासह अनेक उपक्रम या शाळेत राबवण्यात येणार आहेत. प्रथम चरणात औसा तालुक्यातील तीन शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेत 50 लाख रुपये खर्चून अद्यावत यंत्रणा उभी करण्यात येत आहे. औसा मतदारसंघातील 70 शाळेमध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की, समोर दिसतं ते चित्र नक्कीच चांगलं नसतं. कारण निधीचा अभाव, मोडकळीला आलेल्या इमारती, सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांची अनास्था. हे चित्र महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वत्र पहायला मिळत असतं. इतकं होऊनही जिल्हा परिषदेची शाळा ही ग्रामीण भागातील शिक्षणाचा मुख्य कणा आहे. येथेच जर सर्वांगीण शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली तर या भागातील विद्यार्थी नक्कीच उज्वल भवितव्य तयार करू शकतील, असा विश्वास असल्यामुळे क्रिएटिव्ह फाऊंडेशन लातूर यांनी एक पाऊल उचललं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच निधी देत सुधारणा घडवून आणणं. औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह क्रिएटिव फाउंडेशन यांनी एक उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा परिषदेच्या स्मार्ट शाळेच्या या उपक्रमाला नावही देण्यात आलं आहे. या उपक्रमाचं नाव आहे, शाळा माझी न्यारी उपक्रम. 

Maharashtra News: 'शाळा माझी न्यारी'... लातूर जिल्हा परिषद शाळेतील हजारो विद्यार्थी स्मार्ट करण्याचा न्यारा उपक्रम

शाळा माझी न्यारी म्हणजे काय?

औसा विधानसभा मतदारसंघातील सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा विकसित करणं. सैद्धांतिक शिक्षणाला प्रात्यक्षिक शिक्षणाची जोड देणं, शाळा, केंद्रीय विद्यालयं, कॉन्व्हेंट शाळांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या चित्रकला, गायन, वादन, क्रीडा अशा विविध कलागुणांना वाव मिळवून देणं. पाठ्यक्रम शिक्षणासोबत जीवनावश्यक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाबाहेरील शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं. शाळांना फिट इंडिया, स्वच्छ भारत, खेलेगा इंडिया, जितेगा इंडिया इत्यादी अभियानाशी जोडणं. योग्य करिअर पाथ निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणं यासाठी औसा विधानसभा मतदारसंघातील प्रायोगिक तत्त्वावर दत्तक घेण्यात आलेल्या या जिल्हा परिषदेत शाळेत कॉम्प्यूटर लॅब, सुसज्ज ग्रंथालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान लॅब, क्रीडा केंद्र, स्मार्ट क्लास रुम, जीवन कौशल्ये प्रशिक्षण केंद्र, संस्कार केंद्र, खुली व्यायामशाळा, स्वच्छ आणि सुंदर शाळा, संगीत केंद्र, आर्ट गॅलरी, हरित शाळा आणि आत्मनिर्भर शाळा आशा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी एका शाळेवर किमान 50 लाख रुपये खर्च येणार असून प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या या तीन शाळानंतर मतदारसंघातील जवळपास 77 जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या पुढाकाराने राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी या उपक्रमाअंतर्गत औसा विधानसभा मतदारसंघातील लामजना, बोरफळ व कासारसिरसी कन्या शाळा प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. आज लामजना येथील कन्या शाळेत या उपक्रमाचा शुभारंभ करताना निश्चितच आनंद होत आहे..येत्या काळात औसा मतदारसंघातील 77 शाळेत हा उपक्रम राबवलाच जाणार आहे असा विश्वासी त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

औसा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत काहीतरी पॉझिटिव्ह ..भरीव काम करावं हा विचार सर्व प्रथम आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडला. या शाळा स्मार्ट करून ग्रामीण भागातील मुलांना ही जागतिक स्पर्धेत उतरावं इतकं सक्षम करने आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम शाळा स्मार्ट कराव्यात त्यानंतर  विद्यार्थी स्मार्ट होतील असे सांगत मार्गदर्शन केले. मग  क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून रूपरेषा तयार करण्यात आली. अभ्यासांती एक सक्षम आराखडा तयार झाला. आज लामजना येथील शाळेमध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये मतदार संघातील 77 शाळा स्मार्ट करण्याचा मानस आहे, अशी माहिती क्रिएटिव्ह फाउंडेशन चे सचिव सुहास पाचपुते यांनी दिली आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget