(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur Car Accident : न्यायाधीशासह वाहन चालक मित्राचा दुर्दैवी मृत्यू...रॉंग साईड आलेल्या ट्रकच्या धडकेत अपघाती निधन
Latur News : नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने एका कारला भीषण धडक दिली. या अपघातात न्यायाधीशासह वाहन चालक मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लातूर: विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आहे. मृतांमध्ये दिवाणी कोर्टाचे न्यायाधीश आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे. दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
उद्धव पाटील हे बीड येथील जिल्हा न्यायालयात दिवाणी 'ब' न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) म्हणून कार्यरत होते...अवघ्या आठ महिन्यांपूर्वी ते रुजू झाले होते ...लातूर जिल्ह्यातील त्याचे मूळ गाव अजनसोंडा येथे येत असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला.. यात ते आणि त्याचा चालक मित्र जागीच ठार झाले आहेत ....
उद्धव पाटील लातूर जिल्ह्यातील अंजनसोडाचे रहिवासी...सोळा वर्षांपूर्वी वडिलांना अपघात झाला होता..त्यावेळेस पासून स्वतः कष्ट करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं...लातूर येथेच एलएलबी आणि त्यानंतर एलएलएमचे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं... काही काळ लातूरमध्ये वकील ही केली... आठ महिन्यापूर्वी बीड येथे न्यायाधीश म्हणून ते रुजू झाले होते. सुट्टी असेल त्यावेळेस ते गावाकडे येत असत. दोन दिवसापूर्वी संध्याकाळी ती गावाकडे निघाले होते. अंजनसोडा येथील घरा शेजारी राहणाऱ्या बळी टमके हा गाडी घेऊन बीड येथे आला होता...त्यानंतर संध्याकाळी ते अंजनसोडाकडे निघाले होते. पानगाव जवळील सेवाग्राम तांड्याजवळ गतिरोधकामुळे ट्रकचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. समोरून येणाऱ्या उद्धव पाटील यांच्या कारला धडक बसली.. घटनास्थळीच न्यायाधीश उद्धव पाटील आणि वाहन चालक बळी टमके यांचा मृत्यू झाला.
35 च्या आत असलेली उद्धव पाटील आणि पंचशीचा असलेला बळी टमके त्याच्या मूर्तीची बातमी गावात धडकली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
उद्धव पाटील यांच्या घरी आठ एकर पूर्ण होऊ शेती. सोळा वर्षापासून अपघातामुळे अंथरुणाला खिळलेले वडील...मोठा भाऊ असा परिवार आहे. चार वर्षांपूर्वी उद्धव पाटील यांचं विवाह झाला होता. अडीच वर्षाची एक मुलगी आहे. त्यांची पत्नी गर्भवती असून याच महिन्यात प्रसूतीची तारीख देण्यात आली होती. आता कुठे उद्धव पाटील यांच्या परिवाराला सुखाचे दिवस आले होते. त्यातही घटना घडल्याने कुटुंबावर प्रचंड आघात झाला आहे.
पाटील परिवारांच्या शेजारी राहणारे टमके परिवार ही दुःखात बुडाला आहे. त्यांचा पंचवीस वर्षाचा मुलगा या अपघाताने हिरावून नेला आहे. काही दिवसातच त्याचे लग्न करण्याच्या हालचाली सुरू होत्या. दीड एकर कोरडवाहू शेती करणारा टमके परिवार ऊसतोड कामगारा म्हणून काम करत होते. बळीचा मोठा भाऊ आणि बळी यांनी कष्टाने घर सावरले होते. बळी मागील काही वर्षापासून वाहन चालक म्हणून काम करत होता. त्याने स्वतःची गाडी घेतली होती. याच गाडीतून घरासमोर राहणारा आपला मित्र उद्धव पाटील यांना गावाकडे घेऊन येण्यासाठी तो गेला होता.
एकाच दिवशी गावातील दोन होतकरू तरुण मुलाचे अपघाती निधन झाल्याने पाटील आणि त्यांचे परिवारावर आघात झाला आहे.. आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भरधाव असलेला ट्रक गतिरोधकावरून गेल्यामुळे ट्रक चालकाचा वाहनावरून ताबा गेला आणि डिव्हायडरवरून विरुद्ध दिशेला आला. त्या बाजूने येणारी कार ट्रकवर जोरदार आदळली गेली. हा अपघात एवढा भीषण होता की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाहन चालवताना कसलीही चूक नसताना ही न्यायाधीश उद्धव पाटील यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत.