चालकाचं नियंत्रण सुटलं अन् ट्रॅव्हल्स पुलावरुन कोसळली; आठ ते दहा प्रवासी जखमी
उदगीर लातूर वरून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्साचा रात्री 12 च्या सुमारास अपघात झाला आहे. चालकांचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल्स पुलावरून खाली कोसळली आणि अपघात झाला.
Pune Accident News: पुण्याला (Pune News) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा लातूर-मुरूड महामार्गावर (Latur Murud Highway) अपघात (Accident News) झाला आहे. चालकाचा नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली. खिडकीच्या काच फोडून प्रवाशी बाहेर आले. अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना 108 रूग्णवाहिकेनं रूग्णालयात हलवलं आहे. सुदैवाची बाब म्हणजे, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
उदगीर लातूर वरून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्साचा रात्री 12 च्या सुमारास अपघात झाला आहे. चालकांचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल्स पुलावरून खाली कोसळली आणि अपघात झाला. अपघातावेळी ट्रॅव्हल्समधून जवळपास 38 प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात पुण्याकडे जात असताना लातूर-मुरूड महामार्गावर झाला आहे. या अपघातात 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. काही प्रवाशांच्या हाताला, डोक्याला मार लागला आहे. अपघात होताच प्रवाशांनी खिडकीचं काच फोडून बाहेर येऊन आपला जीव वाचवला आहे. जखमींना तात्काळ 108 रुग्णवाहिकांनी लातूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमींवर सध्या लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ बचावकार्य सुरू केलं.
अभिनव ट्रॅव्हल्सची उदगीर पुणे आणि पुणे उदगीर अशी सेवा मागील काही वर्षांपासून सुरू आहे. या ट्रॅव्हल्सला दोन चालक असतात. या अपघातात एका चालकाला मार लागला आहे. अपघाताचं वृत्त तात्काळ लातूर येथील ट्रॅव्हल्स मालकांना कळवण्यात आलं आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात यंत्रणा सजग झाली. घटनास्थळाकडे वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली. ट्रॅव्हल्स असोशियशनचे अनेक लोक घटनास्थळाकडे धाव घेताना दिसून आले. लातूर जिल्ह्यातून दीडशे पेक्षा जास्त ट्रॅव्हल्स दररोज पुण्या-मुंबईकडे रवाना होत असतात.